कर्नाटकात शाळकरी मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या मुख्याध्यापकाला विद्यार्थिनींकडून चोप !

बेंगळुरू – कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील पांडवपुरा तालुक्यातील कट्टेरी येथील सरकारी शाळेचा मुख्याध्यापक चिन्मयानंद याने शाळेच्या हॉस्टेलमध्ये एका मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनींनीच मिळून मुख्याध्यापकाला चोप देत पोलिसांच्या कह्यात दिले.

मुख्याध्यापकाने त्याच्या कार्यालयात बोलावले आणि मला छेडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. ‘चिन्मयानंद हा अन्य मुलींसोबतही असभ्य वर्तन करायचा’, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. ‘या प्रकरणाची बाहेर माहिती दिल्यास शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये चुकीचा शेरा देऊन संबंधित विद्यार्थिंनींची प्रतिमा मलिन करण्यात येईल’, अशी धमकी या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींना दिली होती. ‘मुख्याध्यापक आम्हाला अश्‍लील व्हिडिओ दाखवायचा’, असा आरोपही विद्यार्थिनींनी केला आहे.’

संपादकीय भूमिका

  • असे वासनांध मुख्याध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक ! अशांना बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !