धारगळ, पेडणे येथे ‘सनबर्न’च्या आयोजनावरून पेडणे तालुक्यात २ गट
धारगळ येथे सनबर्न महोत्सवाच्या आयोजनावरून पेडणे भागात विरोधक आणि समर्थक, असे २ गट निर्माण झाले असून या दोन्ही गटांनी आपापल्या बैठका आयोजित केल्या आहेत. सनबर्नला अनुमती देऊ नये, अशा आशयाचे पत्र आम आदमी पक्षाच्या पेडणे येथील शाखेकडून पंचायतीला देण्यात आले आहे.