म्हापसा : ‘सनबर्न’ महोत्सवात २८ डिसेंबर या पहिल्याच दिवशी २ मुलींची प्रकृती अचानक बिघडली. या २ मुली अस्वस्थ झाल्यावर त्यांना रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. अशाच प्रकारे महोत्सवाच्या दुसर्या दिवशी म्हणजे २९ डिसेंबर या दिवशी एक तरुण अस्वस्थ झाल्यानंतर त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. अमली पदार्थाच्या सेवनामुळे हा प्रकार घडल्याची सध्या चर्चा चालू आहे; मात्र याला अधिकृतरित्या पुष्टी मिळालेली नाही.
‘सनबर्न’मध्ये महागडे भ्रमणभाष चोरणारी आंतरराज्य टोळी गजाआड
सर्व चोर अल्पसंख्यांक धर्मांध !
पणजी : ‘सनबर्न’मध्ये महागडे भ्रमणभाष चोरणारी आंतरराज्य टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. २८ डिसेंबरपासून ‘सनबर्न’ महोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर महागडे भ्रमणभाष संच चोरीस गेले आहेत. पोलिसांनी साध्या वेशात घटनास्थळी उपस्थित राहून ही कारवाई केली. पोलिसांनी या प्रकरणी सैमुल्ला खान, उस्मान मेमन, अक्तर पडाया, अब्दुल रहमान, सत्तर अली सय्यद, महंमद झीशन आणि सोहिली शेख यांना कह्यात घेतले आहे. पोलिसांनी संशयितांकडून एकूण सुमारे २५ लाख रुपये किमतीचे २९ महागडे भ्रमणभाष संच कह्यात घेतले. पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापसा पोलिसांनी ही कारवाई केली.