Denigration Of Bhagwan Shiva : ‘सनबर्न’ आणि ‘शापोरा महोत्सव’ यांमध्ये भगवान शिवाचा अवमान

हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांची म्हापसा पोलिसात तक्रार

म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर (डावीकडून दुसरे) आणि इतर हिंदुत्वनिष्ठ

म्हापसा, ३० डिसेंबर : ‘सनबर्न’ आणि ‘शापोरा महोत्सव’ यांमध्ये भगवान शिवाचा अवमान केल्याच्या प्रकरणी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांनी म्हापसा पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनंतर त्वरित पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी ‘शापोरा महोत्सवा’च्या आयोजकांना संपर्क साधून ‘महोत्सवाच्या तिकिटावर प्रसिद्ध केलेले भगवान शिवाचे चित्र हटवावे’, अशी समज दिली.

तक्रारीवर स्थानिक पंचायतीचे पंचसदस्य गोविंद गोवेकर, ‘स्वराज्य गोमंतक’ संघटनेचे उदय मंजू, ‘महिला स्वयंसेवी गटा’च्या सौ. हेमश्री गडेकर, गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष सर्वश्री चंद्रकांत (भाई) पंडित, ‘रणरागिणी’च्या सौ. राजश्री गडेकर, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर आणि श्री. युवराज गावकर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. तक्रारीत पुढे म्हटले आहे की, भगवान शिवाचा अवमान केल्याने समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. धार्मिक सलोखा बिघडवणार्‍या ‘सनबर्न’ आणि ‘शापोरा महोत्सव’ यांच्या आयोजकांवर कठोर कारवाई करावी.

हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांनी म्हापसा पोलीस उपअधीक्षकांकडे नोंदवलेली तक्रार –

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

काँग्रेसची उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रार

म्हापसा : ‘सनबर्न’ महोत्सवात भगवान शिव यांचा जाणीवपूर्वक धार्मिक अवमान केल्याची तक्रार काँग्रेसने उपविभागीय पोलीस अधिकार्‍याकडे केली आहे. या प्रकरणी तातडीने अन्वेषण करून आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.

काँग्रेसचे नेते विजय भिके आणि पक्षाचे इतर पदाधिकारी यांनी ही तक्रार नोंदवली आहे. ‘सनबर्न’मध्ये मोठ्या पडद्यावर भगवान शिवाचे चित्र लावलेले आहे.

हे ही वाचा –

♦ Sunburn Denigration Bhagwan Shiva : ‘सनबर्न’मध्ये भगवान शिवाचे विडंबन !
https://sanatanprabhat.org/marathi/750373.html