विवाहित हिंदु महिला विवाहित मुसलमानासमवेत पळून गेल्याचे प्रकरण
धारवाड (कर्नाटक) – श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी धारवाडमध्ये ३० ऑगस्ट या दिवशी पोलीस ठाण्यासमोर लव्ह जिहादविरोधी आंदोलन केले. ११ जुलै या दिवशी आंजनेय नगरातील एक २० वर्षीय विवाहित महिला बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्गच्या मुन्ना नावाच्या मुसलमान व्यक्तीसमवेत पळून गेली. (धर्मशिक्षण नसल्यामुळेच विवाहित हिंदु महिला लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकून एका विवाहित मुसलमानासमवेत पळून जाते ! – संपादक) हा लव्ह जिहाद असल्याचे सांगत श्रीराम सेनेने हे आंदोलन केले. मुन्ना याच्यावर अपहरणाचा गुन्हा नोंदवावा आणि त्या दोघांना एक आठवड्यात परत आणा, अशी मागणी केली. तंगेम्मा नावाची विवाहित महिलेच्या घरासमोरील घरात मुन्ना ३ महिन्यांपूर्वी भाड्याने रहात होता. या काळात त्यांची ओळख झाली होती.