हावेरी (कर्नाटक) – हिंदु महिलांच्या रक्षणासाठी हुब्बळ्ळीसह राज्यातील ४ ठिकाणी श्रीराम सेनेने चालू केलेला ९०९०४४३४४४ हा हेल्पलाईन क्रमांक परिणामकारक रीतीने कार्य करत आहे, अशी माहिती श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
Hindu women are benefiting from Sri Ram Sena’s helpline number! – Pramod Mutalik
Regarding the helpline, Mr. Mutalik said that there is a group of 5 people in the helpline, which includes Doctors, Advocates and Counsellors.#SaveHinduGirls #NoConversion pic.twitter.com/VGn1XdyibB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 13, 2024
१. प्रमोद मुतालिक पुढे म्हणाले की, नेहा हिरेमठ हिच्या हत्येनंतर एका आठवड्यात हुब्बळ्ळी येथे अशी ५ प्रकरणे घडली आहेत. हे गांभीर्याने घेऊन श्रीराम सेनेने हेल्पलाईन चालू केली. त्यानंतर त्यावर ३०० दूरभाष आले. हत्या करण्याची, तसेच हेल्पलाईन बंद पाडण्याची धमकीही यावर मिळाली. यासह लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलीच्या कुटुंबांचेही दूरभाष आले. पोलिसांच्या निष्क्रीयतेचीही माहिती याद्वारे मिळाली.
२. हेल्पलाईनविषयी श्री. मुतालिक म्हणाले की, हेल्पलाईनमध्ये ५ जणांचा गट आहे. यामध्ये वैद्य, अधिवक्ता आणि समुपदेशक यांचा समावेश आहे. संकटात असलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्याचे कार्य श्रीराम सेनेचे कार्यकर्ते करत आहेत. ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या अनेक हिंदु महिलांचे रक्षण श्रीराम सेनेने केले आहे. धारवाड जिल्ह्यातील ५० विद्यार्थ्यांना त्रिशूल दीक्षा देण्यात आली आहे.