मंड्या (कर्नाटक) – येथील नागमंगलमध्ये झालेल्या दंगलीत अटक केलेल्या बद्रिकोप्पलू गावातील हिंदु युवकांना मंड्या जिल्हा कारागृहात भेटण्यासाठी येणार्या श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांना जिल्ह्याच्या सीमेवरील मड्डूरु तालुक्यातील निडघट्टा येथे पोलिसांनी अडवले. याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलतांना श्री. मुतालिक म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेद्वारे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहे. मी मंड्या येथे भेट दिल्यानंतर काही घडले, तर माझ्याविरुद्ध गुन्हा नोंदवा; परंतु आम्हाला अशा प्रकारे अडवणे, हा अक्षम्य गुन्हा आहे. काँग्रेस सरकार आल्यापासून हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. नागमंगल आणि दावणगेरे येथील घटना, हे त्याचे पुरावे आहेत. आज पॅलेस्टाईनचा ध्वज फडकावतात, उद्या पाकिस्तानचा ध्वज फडकावतील. अशा लोकांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. ईद मिलादच्या वेळी असे ध्वज का फडकवले जातात ?’, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
संपादकीय भूमिकापोलिसांना असे का सांगावे लागते ? त्यांना स्वतःहून हे कळत नाही का ? |