Pramod Mutalik : श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांना शिवमोग्गा जिल्हाप्रवेश बंदी करून रात्रीच माघारी पाठवले

‘लव्ह जिहाद’ पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाची कार्यवाही

श्री. प्रमोद मुतालिक

शिवमोग्गा (कर्नाटक) – श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक शिवमोग्गा येथे ‘लव्ह जिहाद’ नावाच्या  पुस्तकाच्या प्रकाशनासाठी २८ फेब्रुवारीला आले असता पोलिसांनी त्यांना अडवले आणि माघारी पाठवल्याची घटना घडली आहे. श्री. प्रमोद मुतालिक इतर धर्माबद्दल द्वेषपूर्ण भाषण करतात. त्यांच्या विरुद्ध राज्यभरात सुमारे ३० गुन्हे नोंद आहेत. शिवमोग्गा हे संवेदनशील क्षेत्र असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा आदेश जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (जर असे असेल, तर शिवमोग्गा येथे टिपू सुलतानपासून अनेक विषयावर अनेकदा धर्मांध मुसलमानांनी दंगली घडवल्या असतांना त्यांच्यावर कधी कारवाई केली आहे का ? – संपादक) श्री. मुतालिक यांना फेब्रुवारी २८ फेब्रुवारीपासून ते पुढील ७ दिवसापर्यंत जिल्हाप्रवेश बंदी घातली आहे.

१. मार्च १ च्या सकाळी ११ वाजता वार्ताभवन येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नंतर शुभम् हॉटेलमध्ये पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली होती; पण पोलिसांनी प्रमोद मुतालिक यांना शिवमोगामध्ये प्रवेश घेताच अडवले. या वेळी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आणि जिल्हाधिकारी यांनी दिलेली आदेशानुसार त्यांना त्यांना परत पाठवून दिले. (जर येथे मुसलमान संघटनेचे नेते आले असते, तर अशी तत्परतेचे कार्यावाही करण्याची धाडस हे दाखवले असते का ? – संपादक)

२. जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या या कृतीवर प्रमोद मुतालिक यांनी प्रशासनावर टीका करत म्हणाले की, काँग्रेस सरकार हिंदुविरोधी आहे. काँग्रेसचे कुप्रशासन उठून दिसत आहे. (स्वतःला हिंदू म्हणून घेणारे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यावर काही बोलणार का ? – संपादक)

रस्त्यावर करण्यात आले पुस्तक प्रकाशन

भाजपचे आमदार चन्नबासप्पा आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य के. ई. कांतेश यांच्यासह प्रमुख व्यक्ती घटनास्थळी पोचल्या. त्या वेळी श्री. प्रमोद मुतालिक यांनी रस्त्यावरच पुस्तकाचे आणि त्या संदर्भातील भित्तीपत्रकाचे प्रकाशन केले. (हिंदूंची स्थिती कशी केविलवाणी झाली आहे याचे हे द्योतक आहे. एरव्ही व्यक्तीस्वातंत्र्याचा नावाखाली टाहो फोडणारे मंडळी अता यावर काही बोलणार कि नेहमी प्रमाणे मूग गिळून गप्प बसणार ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘लव्ह जिहाद’मुळे कित्येक महिला, मुली यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे, तर यावर अन्वेषण करून धर्मांध मुसलमानांवर कारवाई करण्यापेक्षा याला वाचा फोडाण्यास विरोध करणारे काँग्रेस सरकार !  
  • काँग्रेस सरकारची हुकूमशाही ! भारतीय राज्यघटनेने नागरिकांच्या दिलेल्या अधिकारावर गदा आणणारी काँग्रेस लोकशाहीद्रोहीच होत !