प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज, १९ जानेवारी (वार्ता.) – श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथील सेक्टर ९, गंगेश्वर कैलाशपुरी चौक, कैलाशद्वार येथे लावण्यात आलेल्या ‘सनातन संस्कृती आणि ग्रंथ प्रदर्शना’ला भेट दिली. या वेळी सनातनच्या साधकांनी त्यांना प्रदर्शनात लावलेल्या फलकांची माहिती दिली. या प्रदर्शनातील तीर्थक्षेत्रांविषयी लावलेल्या फलकांविषयी मुतालिक यांनी जिज्ञासेने जाणून घेतले.