लांजा येथे गोवंशियांची अवैध वाहतूक : दोन मुसलमानांवर गुन्हा नोंद

टेंपो आणि गोवंश मिळून एकूण २ लाख ८० सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या कह्यात

प्रतिकात्मक चित्र

लांजा – व्हेळ ते पाचल रस्त्यावरून गोवंशियांची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी मूर मुस्लिम वाडी, राजापूर येथील नाझीम हुसेन फकीर आणि आजीम हुसेन फकीर या दोघांच्या विरोधात विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

व्हेळ ते पाचल रस्त्यावरून अवैधरित्या गुरांची वाहतूक होणार असल्याची माहिती ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्याची माहिती कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून रिंगणे कोंड येथे कारवाई करून टेंपो पकडला. टेंपो आणि गोवंश मिळून एकूण २ लाख ८० सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी कह्यात घेतला आहे.