अहिल्यानगर येथे विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजनाने दुर्गामाता दौडीची सांगता !
‘दुर्गामाता की जय’, ‘पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय’ अशा जयघोषात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कडून शस्त्रपूजन झाले. प.पू. संभाजी भिडेगुरुजी संचलित श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त १० दिवस सावेडी उपनगरातील विविध देवी दर्शनासाठी दुर्गामाता दौड काढण्यात आली.