‘विदेशात आणि भारतात अनेक ठिकाणी प्राचीन मंदिरे नष्ट करून तेथे अन्य पंथीय त्यांची प्रार्थनास्थळे बांधतात. अन्य पंथीय लोक हिंदूंच्या अनेक देवतांची मंदिरे पूर्णपणे उद्ध्वस्त न करता तेथे नवीन बांधकाम करून प्रार्थनास्थळे बनवतात, तर काही वेळा मंदिरे भुईसपाट करून त्यांची जागा पूर्णपणे कह्यात घेऊन तेथे नवीन बांधकाम करून प्रार्थनास्थळे बांधतात. ‘मंदिरांच्या संदर्भात अन्य पंथियांनी केलेले अपप्रकार आणि त्यांचे दुष्परिणाम’ यांच्या संदर्भात सनातन संस्थेचे साधक श्री. संजय मुळ्ये (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६४ वर्षे) यांनी विचारलेल्या प्रश्नांना देवाने मला दिलेल्या ज्ञानमय उत्तरांतून अशा घटनांमागील उलगडलेला आध्यात्मिक कार्यकारणभाव येथे लेखबद्ध केला आहे. २३ मार्च २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भ्रष्ट मंदिरे पुन्हा मूळ स्वरूपात आणली किंवा जीर्णाेद्धारासारखा प्रयत्न केला, तर हिंदु समाजाला कोणता लाभ होतो ?’, याविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग देत आहोत.
(भाग ४)
या लेखातील भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/895342.html
७. केवळ मंदिरांची पुनर्स्थापना किंवा जीर्णाेद्धार न करता त्यानंतर मंदिराच्या संदर्भात विविध कृती केल्यामुळे होणारे लाभ
जागृत देवस्थानात देवतेचे दर्शन घेणे, देवाला अभिषेक करणे, देवाच्या आरतीला उपस्थित रहाणे, देवस्थान स्वच्छ करणे, उत्सवाच्या वेळी विविध सेवांत सहभागी होणे आणि देवस्थानाला अन्न, पैसा इत्यादी अर्पण देणे यांच्यामुळे भाविकाला त्याच्या योगमार्गानुसार विविध प्रकारचे लाभ होतात.

७ अ. साधकाच्या संदर्भातील विविध घटक आणि योगमार्ग यांनुसार त्यांना मंदिराच्या संदर्भात केलेल्या विविध कृतींमुळे होणारे लाभ
७ आ. परकीय आक्रमणकर्त्यांनी विध्वंस केलेल्या हिंदु मंदिरांचा विविध राजे आणि मंत्री यांनी केलेला जीर्णाेद्धार किंवा पुनर्स्थापना : मंदिरांचे महत्त्व जाणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांनी पोर्तुगिजांनी पाडलेल्या सप्तकोटेश्वर मंदिराची पुनर्स्थापना केली. भारतावर सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे राज्य असतांना अफगाणिस्तानातील महंमद गझनीने भारतावर आक्रमण करून तेव्हाच्या सौराष्ट्रातील आणि आताच्या गुजरात राज्यातील सोरटी सोमनाथाचे मंदिर १७ वेळा लुटून उद्ध्वस्त केले. त्यानंतर अनेक हिंदु राजांनी या मंदिराची पुनर्स्थापना केली; परंतु परकीय आक्रमणकर्त्यांनी वारंवार सोरटी सोमनाथासह अनेक मंदिरांचा विध्वंस केला. त्यानंतर वर्ष १९४७ मध्ये भारत इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाल्यावर भारताचे पहिले संरक्षण मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोरटी सोमनाथाची पुनर्स्थापना केली.
८. कृतज्ञता
भगवंताच्या कृपेनेच मंदिरांच्या संदर्भात साधकाने विचारलेल्या विविध प्रश्नांची ज्ञानमय उत्तरे प्राप्त झाली आणि ‘मनुष्याच्या उद्धारासाठी मंदिरांचे धार्मिक अन् आध्यात्मिक स्तरांवरील महत्त्व किती आहे !’, हे शिकायला मिळाले. याबद्दल मी भगवंताच्या चरणी लक्ष लक्ष वेळा कृतज्ञता व्यक्त करते आणि त्याच्या सुकोमल चरणी कृतज्ञतारूपी भावपुष्प समर्पित करते.’
(समाप्त)
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.