संस्कृत भाषेचे सौंदर्य : मूर्खाला केलेला उपदेश त्याच्या कोपाला कारण होणे

मूर्खाला केलेला उपदेश हा त्याच्या कोपाला कारण होतो, शांततेला नाही. सापाला दूध पाजले, तर त्याचे विष होते. मूर्खाला उपदेश करूनसुद्धा उपयोग नसतो.

संस्कृत भाषेचे सौंदर्य : मूर्खांचा सहवास नकोसा वाटणे

पर्वतांसारख्या दुर्गमस्थानी वनचरांसह भ्रमण करणे बरे; पण मूर्खांचा सहवास, देवाधिदेव इंद्राच्या महालात घडला तरी तो बरा नव्हे.

संस्कृत भाषेचे सौंदर्य : मूर्खाचे हृदय कळणे अशक्य असणे

वाळू पिळून प्रयत्नाने त्यातून तेलही काढता येऊ शकेल, तहानेने व्याकूळ झालेला मृगजळातील पाणी पिऊ शकेल, कदाचित् (वनात) भटकून सशाचे कान मिळू शकेल…

संस्कृत भाषेचे सौंदर्य : मूर्खाची लक्षणे

मूर्खाने मूर्खाला पाहिले, तर तो चंदनापेक्षा थंड होतो; पण त्याने विद्वानाला पाहिले, तर ‘हा आपल्या बापाचा खुनी आहे’, असे मानून त्याच्याकडे पहातो. शहाण्यांचा द्वेष करणे, हा तर मूर्खाचा स्वभाव आहे.  

संस्कृत भाषेचे सौंदर्य : दुर्जनांचे हृदय परिवर्तन करणे ब्रह्मदेवालाही शक्य नसणे !

दुस्तर सागराला तरून जाण्यासाठी नौका, अंधःकारातून जाण्यासाठी दिवा, वारा नसतांना पंखा, हत्तीचा मद शांत करण्यासाठी अंकुश इत्यादी उपाय ब्रह्मदेवाने निर्माण केले….

मुंबई विद्यापिठाचा ऑक्सफर्ड विद्यापिठाशी शैक्षणिक सामंजस्य करार !

भागवत पुराणाच्या महाप्रकल्पासाठी हिंदु अध्ययन केंद्र आणि संस्कृत विभाग विशेष योगदान देणार आहेत तसेच ‘मंदिर व्यवस्थापना’चा अभ्यासक्रम विकसित करण्यात येणार आहे.

Oath In Sanskrit : राजस्थान विधानसभेत २ मुसलमानांसह १६ नवीन आमदारांनी घेतली संस्कृत भाषेतून शपथ !

विशेष म्हणजे काँग्रेसचे आमदार जुबैर खान आणि अपक्ष आमदार युनूस खान यांचा यात समावेश आहे.

संस्कृत भाषेचे सौंदर्य : स्त्रियांमध्ये मुळातच चातुर्य असणे

मनुष्येतर प्राण्यात स्त्रियांमध्ये न शिकताच चातुर्य दिसून येते, तर ज्यांना शिक्षण मिळाले आहे, अशा स्त्रियांविषयी काय बोलावे ?

संस्कृत भाषेचे सौंदर्य : दुष्टाच्या अणूएवढ्या संगतीनेसुद्धा मोठ्या सद्गुणाचा नाश होणे

ताकाच्या संगतीने दूध नासते. त्याचे गुणांतर आणि रूपांतर होते. त्याप्रमाणे दुष्टाच्या अणूएवढ्या संगतीनेसुद्धा मोठ्या सद्गुणाचा नाश होतो.

संस्‍कृत भाषेचे सौंदर्य : दुर्जनाची मैत्री दिव्‍याच्‍या ज्‍वालेसमान असणे !

दुर्जनदूषितमनसां पुंसां सुजनेऽपि नास्‍ति विश्‍वासः।
दुग्‍धेन दग्‍धवदनस्‍तक्रं फूत्‍कृत्‍य पामरः पिबति॥
अर्थ : दुर्जनाच्‍या अनुभवाने माणसाचे मन दूषित झाले की, त्‍याचा सज्‍जनावरचा विश्‍वाससुद्धा उडतो. दुधाने तोंड पोळले की, माणूस ताकसुद्धा फुंकून पितो.