‘संस्कृत संस्कृती संवर्धन संघ, देवाची आळंदी’ यांचा उपक्रम !
पिंपरी (जिल्हा पुणे) – ‘संस्कृत संस्कृती संवर्धन संघ, देवाची आळंदी’ आयोजित पश्चिम राज्यस्तरीय खुली ऑनलाईन ‘शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा’ घोषित करण्यात आली आहे. १ ते १० मे २०२४ या कालावधीमध्ये ही स्पर्धा होणार आहे. सहभागी होणार्या उमेदवारांना २१ ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये नावनोंदणी करता येईल, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक आदिनाथ सातपुते यांनी दिली.
सातपुते पुढे म्हणाले की, वर्षातून एकदाच घेतल्या जाणार्या या संस्कृत स्पर्धेमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांतील स्पधर्क सहभागी होऊ शकतात. स्पर्धकांची ५ गटांमध्ये विभागणी केली आहे. भारतासह विदेशातीलही नागरिक या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. हे स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे. चौथ्या वर्षांमध्ये एकूण ७५२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या वर्षीही अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घेऊन ‘संस्कृत प्रचार आणि प्रसारा’स हातभार लावावा’, असे आवाहन ‘संस्कृत संस्कृती संवर्धन संघा’ने केले आहे.