संस्कृत भाषेचे सौंदर्य : दुष्टाच्या अणूएवढ्या संगतीनेसुद्धा मोठ्या सद्गुणाचा नाश होणे

ताकाच्या संगतीने दूध नासते. त्याचे गुणांतर आणि रूपांतर होते. त्याप्रमाणे दुष्टाच्या अणूएवढ्या संगतीनेसुद्धा मोठ्या सद्गुणाचा नाश होतो.

संस्‍कृत भाषेचे सौंदर्य : दुर्जनाची मैत्री दिव्‍याच्‍या ज्‍वालेसमान असणे !

दुर्जनदूषितमनसां पुंसां सुजनेऽपि नास्‍ति विश्‍वासः।
दुग्‍धेन दग्‍धवदनस्‍तक्रं फूत्‍कृत्‍य पामरः पिबति॥
अर्थ : दुर्जनाच्‍या अनुभवाने माणसाचे मन दूषित झाले की, त्‍याचा सज्‍जनावरचा विश्‍वाससुद्धा उडतो. दुधाने तोंड पोळले की, माणूस ताकसुद्धा फुंकून पितो.

संस्कृत भाषेचे सौंदर्य : दुर्जनांचा संग नको !

दुर्जनासह सख्य किंवा मैत्रीसुद्धा करू नये. कोळसा उष्ण असला, तर जाळतो आणि थंड असला, तर हाताला काळे करतो. म्हणजेच दुर्जन सामर्थ्यवान असेल, तर तुमचा नाश करेल आणि तो थंड रक्ताचा असेल, तर तुमच्या जीवनाला दूषित करील.

संस्कृत भाषेचे सौंदर्य : साधनेचे महत्त्व

आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी पृथ्वी सोडण्याचा जरी प्रसंग आला, तर मायेत न अडकता तिचाही त्याग करावा.

नीच आणि दुर्जन मनुष्याविषयी संस्कृत सुभाषिते

ज्याप्रमाणे थकल्यामुळे झाडाच्या सावलीला आलेला हत्तींचा राजा विश्रांती झाल्यावर झाड तोडतो. त्याप्रमाणे दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य आपल्याला साहाय्य करणार्‍याचा सुद्धा नाश करतो.

संस्कृत भाषेचे सौंदर्य

दुर्जनः परिहर्तव्यो विद्ययालङ्कृतोऽपि सन् ।
मणिना भूषितः सर्पः किमसौ न भयङ्करः ॥
विद्येने अलंकृत असलेला दुर्जनसुद्धा टाळावा; कारण ज्या सर्पाच्या डोक्यावर मणी आहे, तो अधिक भयंकर असतो. दुर्जन जर शिकलेला, बुद्धीमान अन् बलशाली असेल, तर तो महाभयंकर होतो.

संस्कृत भाषेचे सौंदर्य

मनुस्मृतीने मातेचा पुष्कळ गौरव केला आहे. स्त्री-मुक्तीवाद्यांनासुद्धा स्त्रीचा एवढा गौरव करता येणार नाही !

संस्कृत भाषेचे सौंदर्य

अर्धं भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्ठतम: सखा ।
भार्या मूलं त्रिवर्गस्य भार्या मित्रं मरिष्यत: ॥

संस्कृत भाषेचे सौंदर्य

संसारकटुवृक्षस्य द्वे फले ह्ममृतोपमे।
सुभाषितरसास्वादः संगतिः सुजनैः सह॥
अर्थ : संसाररूपी कटु वृक्षाची दोनच फळे अमृतासम आहेत. एक सुभाषितांचा रसास्वाद आणि दुसरे सज्जनांची संगती !

संस्कृत भाषेचे सौंदर्य !

ॐ कोन न याति वशं लोके मुखे पिण्डेन पूरितः।
मृदङ्गो मुखलेपेन करोति मधुरध्वनिम्।।
अर्थ : या जगात (पैसे) खाऊ घातल्यावर कोण आपलेसे होत नाही ? मृदुंगसुद्धा कातडीच्या मध्यावर कणकेचा गोळा चिकटवल्यावर (आपल्याला हवा तसा) गोड गोड ध्वनी काढू लागतो.