संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे विद्यार्थी महाकुंभपर्वात सहभागी !
महाकुंभपर्वात केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे विद्यार्थी येथील विविध आखाडे आणि वेगवेगळे मंडप यांमध्ये जाऊन रूद्रपाठ, स्तोत्रपठण, पूजा, संस्कृत गीत गायन, वैदिक मंत्रपठण करून आणि सामाजिक माध्यमांचा वापर करून संस्कृत भाषेचा प्रचार अन् प्रसार करत आहेत, अशी माहिती जयपूर येथील प्रा. डॉ. देवकरण शर्मा यांनी दिली.