जळगाव येथील नवनिर्वाचित भाजप खासदार स्मिता वाघ यांची सनातनच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट !

खासदार श्रीमती स्मिता वाघ यांचा सत्कार करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव

जळगाव – येथील नवनिर्वाचित भाजप खासदार श्रीमती स्मिता वाघ यांनी सनातनच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी त्यांना सनातननिर्मित श्रीकृष्णाचे चित्र देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी सेवाकेंद्रात सनातनचे साधक उपस्थित होते.

सनातन संस्कृतीचे रक्षण करणे आपले सामूहिक दायित्व आहे ! – खासदार स्मिता वाघ

आपल्या सर्वांचे मूळ सनातन आहे. आपली संस्कृती सर्वथा आदर्श आहे. आज आपल्याला कुटुंबव्यवस्थेचा सांभाळ करावा लागणार आहे. अनेक आव्हाने आपल्या समोर आहेत; पण आपण सर्वांनी सामूहिक दायित्व म्हणून हे कार्य करायला हवे. आपले या क्षेत्रात उत्तम कार्य चालू आहे.