सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या सहवासात पुणे येथील सौ. प्रीती कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती

फेब्रुवारी २०२४ मध्ये सद्गुरु नंदकुमार जाधव गुडघेदुखीवरील उपचारांसाठी काही दिवस पुणे येथे आले होते. त्या वेळी ते सौ. वृंदा सटाणेकर यांच्या घरी वास्तव्यास होते. त्या वेळी सद्गुरु काकांच्या सहवासात सौ. प्रीती कुलकर्णी यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

(सद्गुरु) नंदकुमार जाधव

१. ‘सद्गुरु काकांचे वय पुष्कळ असूनही ते प्रत्येक कृती स्वतः करतात.

२. समष्टीचा विचार : मला सद्गुरु काकांच्या समवेत रुग्णालयात जायचे होते. तेव्हा माझा सेवेचा वेळ जाऊ नये; म्हणून ‘अन्य कुणीही माझ्या समवेत आले, तरी चालेल’, असे सद्गुरु काकांनी सांगितले. तेव्हा ‘साधकांना समष्टी साधनेला अधिक वेळ देता यावा’, असा त्यांचा विचार असल्याचे माझ्या लक्षात आले.

सौ. प्रीती कुलकर्णी

३. सद्गुरु काका सौ. वृंदाताई सटाणेकर यांच्या घरी आल्यावर आलेल्या अनुभूती

अ. सद्गुरु काका सौ. वृंदाताईंच्या घरी आल्यावर ‘गुरुदेवच आले आहेत’, असे मला वाटत होते.

आ. त्यांच्या सहवासात माझे मन अंतर्मुख होत होते.

इ. ‘मला आध्यात्मिक लाभ होऊन माझ्यावर आलेले त्रासदायक आवरण नष्ट होत आहे’, असे मला जाणवत होते.

ई. सद्गुरु काका घरी आल्यानंतर दुसर्‍या दिवशी सौ. वृंदाताईच्या घराच्या आगाशीमध्ये चंदनाचा पुष्कळ सुगंध येत होता.

उ. सद्गुरु काकांचे कपडे ज्या कपाटात ठेवले होते, त्या कपाटालाही चंदनाचा सुगंध येत होता.

ऊ. कपाटातील खणांकडे पाहून पोकळी जाणवत होती आणि ‘त्यातूनही चैतन्य मिळत होते’, असे मला जाणवले.

गुरुदेवांच्या कृपेमुळे सद्गुरु काकांचा सहवास लाभला, यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. प्रीती कुलकर्णी, कोथरूड, पुणे.( एप्रिल २०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक