काँग्रेसचे राहुल गांधी, आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस आणि भारतविरोधी षड्यंत्र !

‘भाजपचे लोकसभा खासदार संबित पात्रा यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी भारतविरोधी षड्यंत्र करणार्‍या त्रिकोणाविषयी माहिती दिली. ‘या त्रिकोणाचा एक कोन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी असून ते देशद्रोही आहेत’, असा आरोप त्यांनी केला. ‘ते देशातील सर्वांत मोठे द्रोही आहेत’, असेही पात्रा म्हणाले. याविषयी सुशांत सिन्हा यांनी त्यांच्या ‘यू ट्यूब वाहिनी’वर खासदार संबित पात्रा यांच्याशी वार्तालाप केला. या वेळी संबित पात्रा यांनी परकीय शक्तींकडून भारताला हानी पोचवण्यासाठी होत असलेल्या षड्यंत्रावर प्रकाश टाकला. याविषयी या लेखात पाहूया.

‘ओ.सी.सी.आर्.पी.’ काय आहे ?

‘ओ.सी.सी.आर्.पी.’ (ऑर्गनार्ईज्ड क्राईम करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट) ही शोधपत्रकारिता करणार्‍या २४ संस्थांनी मिळून बनलेली एक विदेशी संस्था आहे. ही संस्था शोधपत्रकारिता करणार्‍या जगभरातील पत्रकारांना एकत्र आणणे आणि त्यांच्या बातम्या प्रसिद्ध करणे यांसाठी काम करते. यापूर्वी प्रसिद्ध झालेली ‘पेगासस हेरगिरी’ आणि ‘पनामा पेपर्स लिक’ ही गाजलेली प्रकरणे या संस्थेने शोधली होती.

१. राहुल गांधी यांची अमेरिकेच्या भूमीवर भारतविरोधी कृती

देशहिताच्या विरोधात कृती करणे, हा देशद्रोह आहे. पूर्वीच्या काळी एखादा राजा गादीवर बसला की, त्याचा विरोधक ती गादी मिळवण्यासाठी शेजारी राजाचे साहाय्य घेऊन स्वत:च्याच राज्यावर आक्रमण करत असे आणि ती सत्ता कह्यात घेण्याचा प्रयत्न करत असे. हाच देशद्रोह होता. सध्याच्या परििस्थतीत तलवार किंवा बंदूक यांच्या साहाय्याने कुणी देशद्रोह करणार नाही. आज देशद्रोह वेगळ्या पद्धतीने होत आहे. हा ‘टूलकिट’चा काळ आहे. ते दिसत नसून अतिशय बेमालूमपणे काम केले जाते. त्याच्या साहाय्याने अमेरिकेत जाऊन राहुल गांधी यांनी ‘विदेशी शक्तीने भारतात हस्तक्षेप केला पाहिजे’ (फॉरेन पॉवर शुड इंटरफेअर इन इंडिया), असे वक्तव्य केले. त्यानंतर २.१२.२०२४ या दिवशी फ्रान्सच्या प्रसिद्ध वर्तमानपत्राने ‘ओ.सी.सी.आर्.पी.’ (ऑर्गनाईज्ड क्राईम करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट)च्या संदर्भात गंभीर खुलासा केला. आज भारताच्या जनतेला ‘ओ.सी.सी.आर्.पी.’ म्हणजे काय ? आणि त्याच्याशी राहुल गांधी यांचा कसा संबंध आहे, हे समजणे आवश्यक आहे.

राहुल गांधी आणि जॉर्ज सोरोस

२. पत्रकारितेच्या माध्यमातून अन्य देशांमध्ये सत्तापालट करण्याचे ‘ओ.सी.सी.आर्.पी.’चे  प्रयत्न

फ्रान्सचे हे वर्तमानपत्र अनेक वेळा खुलासे करत असते. २.१२.२०२४ या दिवशी त्यांनी माध्यमांची जागतिक स्तरावरील सर्वांत मोठी संस्था असलेल्या ‘ओ.सी.सी.आर्.पी.’च्या संदर्भात खुलासा केला. ही माध्यम संस्था आहे. जगात कुठेही संघटित गुन्हा होत असेल किंवा संघटित भ्रष्टाचार होत असेल, तर त्यावर ही संस्था शोध पत्रकारिता करून अहवाल सिद्ध करते आणि त्या माध्यमातून खळबळ निर्माण करते. ‘ओ.सी.सी.आर्.पी.’ ही संस्था तटस्थ नाही. ती मोठमोठे खुलासे तर करते; पण त्यामागे त्यांचा हेतू काही वेगळाच आहे’, असा खुलासा फ्रान्सच्या वर्तमानपत्राने केला. ६ खंडांत व्यापलेल्या ‘ओ.सी.सी.अार्.पी.’चे ५० ते १०० माध्यम भागीदार (मिडिया पार्टनर) आहेत. भारतातही त्यांचे काही मोठे माध्यम भागीदार आहेत. ‘ओ.सी.सी.आर्.पी.’ हा शब्द लोकांनी कदाचित् ऐकला नसेल; पण ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘द गार्डीयन’ ही नावे निश्चित ऐकली आहेत. ही सर्व वर्तमानपत्रे ‘ओ.सी.सी.आर्.पी.’कडून उद्धृत केलेल्या बातम्या त्यांच्या वर्तमानपत्रात छापतात आणि त्यांना मुख्य स्थान देतात. तेव्हा स्वाभाविक आहे की, त्यांनी दिलेल्या मोठमोठ्या बातम्या त्या देशात आणि जगात खळबळ माजवू शकतात, उदा. एकेकाळी ‘पनामा पेपर लिक’ने इतकी खळबळ माजवली होती की, त्यामुळे पाकिस्तानमध्ये सरकार पडले होते. ‘पनामा पेपर लिक’ हेही यांचेच अपत्य आहे. त्यामुळे त्यांचे सत्ता परिवर्तन करणे ही मोहीम आहे.

एखाद्या देशात एखादा मोठा घोटाळा उघड करायचा. त्यानंतर ‘हे सरकार लोकांच्या विरोधात काम करत आहे’, ‘सरकार काहीतरी गडबड करत आहे’, असे लोकांच्या मनात भरवायचे. त्यामुळे लोक सरकारच्या विरोधात उभे ठाकतील आणि सत्ता पालटण्याचा प्रयत्न करतील, हा त्यांचा हेतू असतो. त्याप्रकारे त्यांची ही सत्ता पालटण्याची मोहीम (रेजिम चेंज ऑपरेशन) आहे. देशद्रोह हा शस्त्राने नाही, तर पत्रकारितेने, म्हणजे लेखणीने करील. ते लेखणी काढून अशा प्रकारची माहिती सिद्ध करतील, जी माहिती वाचून जनतेच्या मनात परिवर्तन येईल.

३. ‘डीप स्टेट एजन्सीज’कडून ‘ओ.सी.सी.आर्.पी.’ला आर्थिक पुरवठा

(टीप : जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशाचे सरकार आणि त्या देशाची अर्थव्यवस्था स्वतःच्या मुठीत ठेवण्यासाठी धडपडणारा प्रभावशाली लोकांचा गट, म्हणजे ‘डीप स्टेट’ !)

‘मिडिया पार्ट’नुसार ‘ओ.सी.सी.आर्.पी.’ला आर्थिक पुरवठा करणार्‍यांपैकी ५२ टक्के अमेरिकेच्या ‘डीप स्टेट एजन्सीज’ आहेत. अशा संस्था अमेरिकेत पुष्कळ आहेत, त्याचप्रमाणे भारतातही आहेत. त्या सामान्य लोकांप्रमाणे दिसतात; परंतु सामान्य नसतात, ते धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेला प्रभावित करतात. ज्यांना भारतात ‘शहरी नक्षलवादी’ म्हटले जाते. त्यांना अमेरिकेत ‘डीप स्टेट’ म्हणतात. सरकार कुणाचेही असो, प्रशासन व्यवस्थेत एक यंत्रणा कार्यरत असते. ती यंत्रणा काहीही करू शकते, जे सरकारसाठीही आश्चर्य असते. अमेरिकेचे हे ‘डीप स्टेट’ ‘ओ.सी.सी.आर्.पी.’ला आर्थिक पुरवठा करते. त्यात उद्योगपती रॉकफेलरचाही समावेश आहे. त्यात मुख्य आर्थिक पुरवठा करणारी जॉर्ज सोरोस नावाची व्यक्ती आहे. त्याची ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ ही संस्था आहे. तीही ‘ओ.सी.सी.आर्.पी.’ला आर्थिक पुरवठा करते. अशा प्रकारे आर्थिक पुरवठा करणार्‍यांकडे ‘व्हेटो पॉवर’ (नकाराधिकार) असतात. त्यानुसार ते त्या वृत्तसंस्थेचा संपादक, पत्रकार आणि मुख्य संपादक कोण असेल, हे ठरवतात. ५२ टक्के पैसा जॉर्ज सोरोससह ‘डीप स्टेट’ लावत असतील, तर त्यांचा मुख्य व्यक्तीवर दबाव असतो.

‘व्हेटो पॉवर’ म्हटल्यावर आपल्याला संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा परिषदेतील ५ राष्ट्रांचा ‘व्हेटो पॉवर’ आठवतो. ते म्हणतात, तेच होईल. त्याच्यावर कुणाचे चालणार नाही. त्याचप्रमाणे हे ‘डीप स्टेट’चे खेळाडू आहेत. ते म्हणतात, तेच होईल आणि त्यावर दुसरे मान्य होणार नाही. यातील मुख्य खेळाडू जॉर्ज सोरोस आहेत. त्यांचाही ‘व्हेटो पॉवर’ आहे. तो म्हणेल, तेच होईल. ‘मिडिया पार्ट’ने म्हटले की, ज्याला आपण तटस्थ समजत होतो, जे निष्पक्ष राहून केवळ जगाच्या कल्याणासाठी पत्रकारिता करत आहे, असे समजत होतो, तर प्रत्यक्ष तसे नाही. या पत्रकारितेच्या मागे विशिष्ट हेतू आहे आणि हा हेतू ज्यांनी पैसा दिला, त्यांचा आहे. त्यामुळे ही निश्चितपणे सुपारी पत्रकारिता आहे.

‘पानाच्या दुकानावर बसून चालवली जाणारी ही सुपारी पत्रकारिता आहे’, असे म्हणू शकतो; परंतु येथे त्याला ‘सत्ता पालटण्याची मोहीम’ असे म्हटले जाते. एक-दोन व्यक्तीसाठी ‘सुपारी’ म्हणता येईल; पण जेव्हा संपूर्ण राष्ट्र आणि संस्कृती यांवर आक्रमण करायचे असते, संपूर्ण देशाला पालटायचे असते आणि सत्ता स्थापन करायची असते, तेव्हा त्यापुढे ‘सुपारी’ शब्द थिटा पडतो. त्यामुळे ही सुपारी नसून ‘सत्ता पालटण्याची मोहीम’ आहे.

४. ‘ओ.सी.सी.आर्.पी.’च्या कृत्यांचा भारतावर परिणाम

गेल्या काही वर्षांमध्ये ‘ओ.सी.सी.आर्.पी.’ ही कोणत्या प्रकारची माहिती घेऊन आली आणि त्याचा आपल्यावर कोणता परिणाम झाला ?, यासंदर्भात भारताने अभ्यास केला. तेव्हा आम्हाला धक्का बसला. ‘पेगासेस’चा अहवाल असो, ‘कोविड’ महामारी लसीच्या विरोधातील माहिती असो, ‘हंगर इंडेक्स’चा (भूक निर्देशांक) अहवाल असो, ‘फ्रिडम ऑफ स्पीच’चा (भाषणस्वातंत्र्य) अहवाल असो किंवा ‘या देशात धार्मिक स्वातंत्र्य नसून येथे धर्माच्या विरोधात अत्याचार होत आहेत’, ‘विशिष्ट धर्माच्या विरोधात क्रौर्यपूर्वक आचार-विचार ठेवतात’, अशी माहिती पसरवणारे अहवाल पाहिले, तर त्यांची जननी ‘ओ.सी.सी.आर्.पी.’ आहे, हे लक्षात येते. तेथूनच हे सर्व अहवाल एका पाठोपाठ येतात आणि त्या माध्यमातून ‘भारत असहिष्णू आहे’, असे जगभर पसरवले जाते.

एकेकाळी माध्यमांमधून प्रतिदिन असहिष्णूतेचा घोष चालू होता. ‘पुरस्कार वापसी चळवळ’ चालवली जात होती. नंतर ‘पेगासस’, ‘कोरोनाविरोधी लस मोदींची आहे. ही लस आम्ही घेणारच नाही’, असे सांगण्यात आले. नंतर ठाऊक झाले की, ज्यांनी ‘फायजर’ लस घेतली, ते त्रस्त होऊन फिरत आहेत; परंतु ज्यांनी भारतीय लस घेतली, ते आनंदी आहेत. ही लस एक मानवनिर्मित असून सर्व ‘ओ.सी.सी.आर्.पी.’च्या कारखान्यात बनली आहे.

(क्रमश:)

(साभार : सुशांत सिन्हा यू ट्यूब वाहिनी)