Karnataka Women Sexually Assaulted : कर्नाटकात सहस्रो महिलांवर लैंगिक अत्याचार करून त्याचे व्हिडिओ होत आहेत प्रसारित !

कर्नाटक महिला आयोगाने केली चौकशीची मागणी

हासन (कर्नाटक) – हसन जिल्ह्यात काही आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत, ज्यामध्ये महिलांशी बलपूर्वक शारीरिक संबंध ठेवतांना दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओवरून वादही निर्माण झाला आहे. कर्नाटक राज्य महिला आयोगाने या व्हिडिओंवर आक्षेप घेतला असून कारवाईची मागणी केली आहे. ‘सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना करावी’, अशी आयोगाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे मागणी केली आहे.

१. कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी यांनी म्हटले आहे की, काही प्रभावशाली राजकारण्यांनी महिलांचा अपलाभ घेऊन त्यांचा लैंगिक छळ केला आहे. एवढेच नाही, तर काही नेत्यांनी महिलांवर बलात्कारासारखे गुन्हे केले आहेत. प्रसारित केलेले व्हिडिओ लोकांपर्यंत पोचत आहेत. त्यामुळे समाजाने मान खाली घातली आहे.

२. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सहस्रो महिलांवर लैंगिक अत्याचार झाले आहेत. या घृणास्पद कृत्यांचे भ्रमणभाषवर चित्रीकरण करण्यात आले आहे, जेणेकरून महिलांना ब्लॅकमेल करता येईल.

संपादकीय भूमिका

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून राज्यात एकतरी चांगली घटना घडलेली नाही, तर अशाच प्रकारच्या वाईट घटना समोर येत आहेत. ‘काँग्रेसचे राज्य म्हणजे रावणराज्य’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे !