वास्को येथे सभा होण्याची शक्यता
पणजी, २२ एप्रिल (वार्ता.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गोवा भेट २७ एप्रिल या दिवशी निश्चित झाली आहे आणि भाजपच्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठीच्या उमेदवारासाठी या दिवशी वास्को येथे त्यांची सार्वजनिक सभा होण्याची शक्यता आहे.
वर्ष २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत अवघ्या ९ सहस्र ५०० मतांनी भाजपला दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ गमवावा लागला होता. या मतदारसंघावर भाजपने आता अधिक लक्ष केंद्रित केले आहे आणि यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे दक्षिण गोव्यात आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पुढे ढकलली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची २४ एप्रिल या दिवशी म्हापसा येथे सभा होणार होती; परंतु लोकसभेचे दुसर्या टप्प्यातील मतदान या काळात असल्याने ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.