Love Jihad : देशात ‘लव्ह जिहाद’चा आरंभ झारखंडमधून झाला ! – पंतप्रधान मोदी

 झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार लव्ह जिहाद्यांना संरक्षण देत असल्याचाही केला आरोप  !

प्रचारसभेत बोलतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

दुमका (झारखंड) – झारखंडमध्ये काँग्रेस सत्तेत असतांना मोठ्या प्रमाणात नक्षलवाद वाढला. अनेक तरुणांचे आयुष्य, तसेच अनेक आदिवासी परिवार उद्ध्वस्त झाले. आज झारखंडमध्ये घुसखोर भरले आहेत. त्यामुळे झारखंडमधील आदिवासींची संख्या अल्प होऊ लागली आहे. या घुसखोरांमुळे आदिवासी मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. अनेक मुलींच्या हत्याही करण्यात आल्या, तर काहींना जिवंत जाळण्यात आले आहे. या लोकांना झारखंड सरकार संरक्षण देत आहे. ‘लव्ह जिहाद’चा आरंभही झारखंडमध्ये झाला. झारखंडनेच ‘लव्ह जिहाद’ हा शब्द दिला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित प्रचारसभेत काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षांवर केली.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, झारखंडमधील काही राजकीय नेत्यांनी भूमी हडपण्यासाठी स्वत:च्या आई-वडिलांची नावे पालटली. त्यांनी भारतीय सैन्याची जागाही हडपली. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांनी जनतेच्या ताटातील अन्न चोरले आहे. त्यांनी ‘हर घर जल’ योजनेतही घोटाळा केला. असे घोटाळे करतांना त्यांना थोडीही लाज वाटली नाही. ४ जूननंतर या भ्रष्टाचार्‍यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

संपादकीय भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लव्ह जिहाद असल्याचे मान्य केल्याने ‘लव्ह जिहाद अस्तित्वात नाही’, असे म्हणणार्‍यांना काय म्हणायचे आहे ? आता पंतप्रधान मोदी यांनीच ही राष्ट्रीय समस्या सोडवून हिंदूंना भयमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे हिंदूंना अपेक्षित आहे !