काँग्रेस सर्वांत मोठा जातीयवादी पक्ष ! – काँग्रेसचे माजी नेते हार्दिक पटेल

हार्दिक पटेल हेही काही धुतल्या तांदुळासारखे नाहीत. पाटीदार समाजाच्या कथित हक्कांसाठी त्यांनी केलेले हिंसक आंदोलन जनता विसलेली नाही. काँग्रेसमध्ये राजकीय पोळी भाजता आली नाही; म्हणून त्यांनी पक्षत्याग केला आहे, हे जनता ओळखून आहे !

पिंपळाच्या झाडाखाली दगड ठेवून द्या, तेथे एक ध्वज लावा, झाले मंदिर सिद्ध !

अशा हिंदुद्वेषामुळेच काँग्रेसप्रमाणे समाजवादी पक्षही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे, हे अखिलेश यादव यांनी लक्षात ठेवावे !

शरद पवार यांच्या आशीर्वादाने राज्यात सरकार पुरस्कृत आतंकवाद माजला !

राज्याचे गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असल्यामुळे दंगेखोर कार्यकर्त्यांवर कारवाई न करता आतंकवादास सामोरे जाणार्‍यांवरच कारवाई केली जात असल्याने सत्ताधार्‍यांकडून जाणीवपूर्वक राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याची शंका !

दापोली येथे १३ ते १७ मे या कालावधीत ‘सुवर्ण पालवी’ या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन !

हे प्रदर्शन १३ ते १७ मे या कालावधीमध्ये भरणार असून या प्रदर्शनाविषयी माहिती देण्यासाठी ‘पितांबरी प्रॉडक्ट लिमिटेड’च्या ठाणे येथील कार्यालयात ११ मे या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

(म्हणे) ‘जुने गोवे येथे चर्चच्या ठिकाणी मंदिर होते’, असे सांगून काही हिंदू ‘गाईड’ पर्यटकांची दिशाभूल करतात !’ – मिकी पाशेको

जुने गोवे येथेच नाही, तर गोव्यात अनेक मंदिरे पाडून पोर्तुगिजांनी त्या ठिकाणी चर्च बांधले. पर्यटकांना सत्य इतिहास सांगितल्यावर पाशेको यांच्या पोटात का दुखत आहे ?

राणा यांवरील राजद्रोहाचा गुन्हा अभ्यास करूनच नोंदवला ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

पोलीस अभ्यास करूनच गुन्हा नोंदवतात. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन देतांना त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. पत्रकारांनी विचारल्यावर गृहमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

९० ते ९२ टक्के ठिकाणी मुंबईत सकाळची अजान झाली नाही ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मुंबईतील ही घटना म्हणजे हिंदूंचे एकप्रकारे यशच म्हणावे लागेल. हिंदू संघटित झाल्यास काय होऊ शकते, हे मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर सर्वांनाच उघड झाले. हा संघटितपणा हिंदूंनी तसाच ठेवून हिंदु धर्मावरील सर्वच आघात परतवून लावायला हवेत !

लोकमान्य टिळकांचे रायगडावरील शिवरायांच्या समाधीस्थळाच्या निर्मितीत निश्चित योगदान आहे ! – ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे

वर्ष १८९५ मध्ये लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’च्या माध्यमातून रायगडावरील शिवसमाधीचा जिर्णाेद्धार केला.

आवश्यकता वाटल्यास राज ठाकरे यांच्यावर कारवाई करणार ! – पोलीस महासंचालक

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाचे अन्वेषण संभाजीनगरचे पोलीस आयुक्त करणार असून आवश्यकता वाटल्यास त्यांच्यावर आजच कारवाई करण्यात येईल. याविषयीची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी ३ मे या दिवशी दिली.

आम आदमी पक्ष उत्तरप्रदेशमध्ये रा.स्व. संघाप्रमाणे १० सहस्र शाखा चालू करणार !

भाजप देशात द्वेषाच्या राजकारणाला प्रोत्साहन देत आहे आहे. त्यामुळे देश आणि राज्यघटना दुर्बल होत आहे. जर असेच चालू राहिले, तर भारत त्याचा मूळ चेहरा हरवून बसेल. त्यामुळे भारताला वाचवण्याची आवश्यकता आहे.