पिंपळाच्या झाडाखाली दगड ठेवून द्या, तेथे एक ध्वज लावा, झाले मंदिर सिद्ध !

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी केली हिंदुद्वेषी गरळओक !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथे आलेल्या समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याने हिंदु धर्माच्या विरोधात टिप्पणी केली आहे. यादव म्हणाले, ‘‘हिंदु धर्मानुसार कुठेही एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली दगड ठेवून द्या, तेथे एक ध्वज लावा. झाले मंदिर सिद्ध !’’ यादव यांनी एका पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले. ज्ञानवापी मशिदीचा विषय भाजप अनावश्यकरित्या वाढवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सौजन्य एएनआय न्युज

संपादकीय भूमिका

अशा हिंदुद्वेषामुळेच काँग्रेसप्रमाणे समाजवादी पक्षही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे, हे अखिलेश यादव यांनी लक्षात ठेवावे !