मडगाव, ७ मे (वार्ता.) – ‘जुने गोवे येथे चर्चच्या ठिकाणी मंदिर होते’, असे सांगून काही हिंदु ‘गाईड’ पर्यटकांची दिशाभूल करत आहेत, तसेच फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयीही चुकीची माहिती पर्यटकांना दिली जात आहे. (फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी चुकीची कि ‘झेवियर यांनी हिंदूंवर अत्याचार करून त्यांचे धर्मांतर केले’, हे सत्य हिंदु पर्यटक गाईड सांगत आहेत ? – संपादक) सरकार आणि पोलीस यांनी असे करणार्या गटाला हेरून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा अशा घटनांमुळे हिंसाचार होण्याची शक्यता आहे, अशी चेतावणी माजी मंत्री तथा काँग्रेसचे नेते मिकी पाशेको यांनी त्यांच्या बेताळभाटी येथील निवासस्थानी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. (ही चेतावणी कि हिंसाचार करण्याची धमकी ? – संपादक)
तेे पुढे म्हणाले, ‘‘शासनाने तातडीने जुने गोवे संकुलात पोलिसांची नेमणूक करावी. जुने गोवे येथे पर्यटकांची दिशाभूल करणारे पर्यटक ‘गाईड’ मला सापडल्यास ‘मी त्यांना सोडणार नाही.’ (असे गुंड प्रवृत्तीचे बोलणे लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित नाही ! – संपादक) शासनाने गोव्यातील मंदिरे आणि पुरातन स्थळे यांच्या पुनर्बांधणीसाठी निधीची तरतूद करून मंदिरे पुनरुज्जीवित करण्याचे घोषित केल्यापासून राज्यात २ धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर हे ‘गोंयचो सायब’ नसल्याचे वक्तव्य ‘हिंदु रक्षा महाआघाडी’चे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले. (हे विधान ऐतिहासिक सत्यच आहे. ख्रिस्त्यांनी हे सत्य स्वीकारावे ! – संपादक) मी या विरोधात पोलिसांत तक्रार करूनही प्रा. वेलिंगकर यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. (फ्रान्सिस झेवियर याला ‘गोंयचो सायब’ हा दर्जा पोर्तुगिजांनी दिला होता. स्वतंत्र गोव्यात तो आतापर्यंत चालू राहिला हेच दुर्दैव आहे ! – संपादक) रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (‘आर्.जी.’चे) नेते मनोज परब यांनी सामाजिक माध्यमातून ख्रिस्ती धर्मगुरूंविषयी अवमानकारक ७ ‘पोस्ट’ प्रसारित केल्या आहेत. ख्रिस्त्यांनी ‘आर्.जी.’ला विदेशातून निधी उपलब्ध करून दिला आणि आता मनोज परब ख्रिस्ती धर्मगुरूंविषयी वक्तव्ये करत असतांना ‘आर्.जी.’चे समर्थक गप्प का ?
संपादकीय भूमिकाजुने गोवे येथेच नाही, तर गोव्यात अनेक मंदिरे पाडून पोर्तुगिजांनी त्या ठिकाणी चर्च बांधले. हिंदू सहिष्णु असल्याने गोवा मुक्तीनंतरही त्यांनी या विरोधात आवाज उठवला नाही. आता पर्यटकांना सत्य इतिहास सांगितल्यावर पाशेको यांच्या पोटात का दुखत आहे ? |