(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राच्या वातावरणामुळेत खलिस्तानी अमृतपाल खलिस्तानची मागणी करण्याचे धाडस करतो !’ – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत

खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याला मोठे करण्याचे राष्ट्रघातकी काम काँग्रेसने केले होते. गहलोत या माध्यमातून एकप्रकारे अमृतपालच्या कृत्याचे समर्थनच करत आहेत !

गोव्यात ‘पी.एफ्.आय.’च्या कारवायांना थारा देणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘पी.एफ्.आय.’ ही संघटना पाकिस्तान या शत्रूराष्ट्राचा झेंडा लावत आहे, तरीही आम्ही गप्प का बसतो ? असा संतप्त प्रश्न आमदार कृष्णा साळकर यांनी चर्चेच्या वेळी उपस्थित केला. ‘पी.एफ्.आय.’वर विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार्‍या आमदारांचे अभिनंदन !

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मुलीला अमेरिकेत खलिस्तानवाद्यांकडून धमकी

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची अमेरिकेत रहाणारी मुलगी सीरत यांना खलिस्तानवाद्यांकडून दूरभाष करून धमकी देण्यात आली, तसेच शिवीगाळ करण्यात आली. सीरत ही भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे.

जागतिक उठाव हवा !

खलिस्तानवाद्यांच्या या चळवळीला ठेचण्यासाठी हे वैचारिक प्रदूषण उलथवून लावून भरकटलेल्या शिखांना भारताच्या बाजूने उभे करणे हितावह असणार आहे. या मूलभूत पालटासाठी आता मोदी शासनाने मोर्चेबांधणी केली, तरच खलिस्तानवादावर कायमची जरब बसणार आहे !

(म्हणे) ‘पंजाबमधील घटनांकडे आमचे बारीक लक्ष !’ – कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री

कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताऐवजी कॅनडामध्ये हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तान्यांकडून होणार्‍या आक्रमणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे !

पी.टी.आय.च्या भारतीय पत्रकाराला खलिस्तान्यांकडून मारहाण

वॉशिंग्टन (अमेरिका) येथे भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तान्यांचे आंदोलन

खलिस्तानसाठी स्वतंत्र आर्थिक चलन आणि सैन्य उभारण्याचे अमृतपाल सिंंह याने रचले होते षडयंत्र !

‘एवढे सर्व होईपर्यंत भारताची सुरक्षायंत्रणा काय करत होती ?’ असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडणे साहाजिक आहे !

‘जुनी पेन्शन योजना’ लागू करण्यास सरकार सिद्ध !

गेल्या ७ दिवसांपासून चालू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. ‘जुनी पेन्शन योजना’ पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येईल’, असे आश्वासन सरकारने दिल्याचे संपकर्‍यांच्या समन्वय समितीकडून सांगण्यात आले.

(म्हणे) ‘अमृतपाल याला खोट्या चकमकीत ठार मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो !’ – कॅनडामधील खलिस्तानवादी संघटनेचा आरोप

खलिस्तानवाद्यांचा हा आरोप म्हणजे बचावाचे आणि दबावाचे धोरण आहे. उद्या प्रत्यक्ष जरी चकमक झाली आणि त्यात अमृतपाल ठार झाला, तर पोलिसांवर अन् भारत सरकारवर आरोप करण्यास खलिस्तानवादी मोकळे !

अमृतपाल अटकेत नाही, तर पसार !

अमृतपाल सिंह याला पंजाब पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त सर्वच प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले होते. पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला नव्हता आणि ते फेटाळण्यातही आले नव्हते; आता त्याला अटक झालेली नसून तो पसार आहे असे सांगण्यात येत आहे.