(‘स्लीपर सेल’ म्हणजे नागरिकांमध्ये राहून आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या लोकांचा गट निर्माण करणे)
पुणे – राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने अर्थात् ‘एन्.आय.ए’ने पुण्यातील कोंढवा भागातून डॉ. अदनान अली सरकार याला ‘इसिस’च्या आतंकवादी विचारांचा प्रसार केल्याचा आरोपाखाली अटक केली आहे. डॉ. अदनान हा आतंकवाद्यांच्या सांगण्यानुसार ‘गजवा-ए-हिंद’च्या (भारतात इस्लामी राज्याची स्थापना करण्याच्या) कटानुसार काम करत होता. यासह पुण्यात ‘स्लीपर सेल’ यंत्रणा सिद्ध करण्याचे काम तो करत होता. पुणे शहरात अटक झालेली डॉ. अदनान ही पाचवी व्यक्ती आहे. यामुळे पुणे शहरात आतंकवाद्यांची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पोलिसांसह अन्वेषण यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. (अटक झालेल्यांचे मनसुबे अन्वेषण यंत्रणांनी उघडे पाडले असले, तरी असे अटक न झालेले किती असतील ? आणि ते काय काय षड्यंत्र रचत असतील ? याची कल्पना करताही येणे शक्य नाही ! – संपादक)
(सौजन्य : TIMES NOW Navbharat)
एन्.आय.ए.च्या अहवालात म्हटले आहे की, ‘अॅनेस्थेशिया’मध्ये (भूलतज्ञ) एम्.डी. झालेला डॉ. अदनान सरकार याचे लक्ष्य युवक होते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणार्या युवकांना शोधून त्यांना तो आतंकवादी बनवत होता. त्यासाठी त्या युवकांना पैशांची लालसा दाखवत होता. अदनान सरकार भारताची एकता, अखंडता आणि स्थिरता यांसाठी धोका निर्माण करत होता.
कोंढव्यामध्ये स्लीपर सेल सक्रीय असल्याचा संशय !
अदनान सरकार याला कोंढव्यातून अटक केली आहे. अन्वेषण यंत्रणांनी गेल्या वर्षभरात पकडलेल्या आतंकवाद्यांपैकी बहुसंख्य आरोपी कोंढव्यात वास्तव्यास होते. यामुळे कोंढव्यासह दापोडी, बोपोडी या ठिकाणी ‘स्लीपर सेल’ सक्रीय आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोंढवा भागातील दाट लोकवस्तीत या लोकांचा शोध घेणे यंत्रणांसाठी आव्हानात्मक बनले आहे.
NIA arrests anaesthesiologist Adnan Ali Sarkar from Pune in connection with Maharashtra ISIS terror module case, 5th arrest after Zubair and othershttps://t.co/9I5Mi49PUc
— OpIndia.com (@OpIndia_com) July 28, 2023
संपादकीय भूमिका
|