इंडियन मुजाहिदीनच्या ४ जिहाद्यांना १० वर्षांची शिक्षा !

वर्ष २०१२ मध्ये रचलेल्या जिहादी षड्यंत्राचे प्रकरण !

देहली – सरकारच्या विरोधात देशभरात आतंकवादी कारवाया करण्याचे षड्यंत्र रचल्याच्या प्रकरणी इंडियन मुजाहिदीन या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ४ आतंकवाद्यांना येथील न्यायालयाने १२ जुलै या दिवशी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. दानिश अंसारी, आफ्ताब आलम, इमरान खान आणि ओबेद-उर्-रहमान अशी चौघांची नावे असून सप्टेंबर २०१२ मध्ये त्यांच्या विरोधात अनधिकृत कृत्ये प्रतिबंधक कायदा (यूएपीए), तसेच भारतीय दंड विधान यांच्या अंतर्गत विविध कलमांखाली राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने गुन्हा नोंदवेला होता. यामध्ये भा.दं.वि. १२१ अ (भारत सरकारच्या विरोधात युद्ध पुकारण्याचे षड्यंत्र रचणे) आणि १२३ (युद्ध करण्याची योजना आखून ती सुलभरित्या राबवण्यासाठी लपवणे) यांचा समावेश होता.

संपादकीय भूमिका

भारतविरोधी षड्यंत्र रचणार्‍या जिहाद्यांना शिक्षा देण्यासाठी एका न्यायालयाला ११ वर्षे लागतात ? सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष घालून न्यायप्रणाली गतीमान करण्यासाठी दिशानिर्देश द्यावेत, असे राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !