श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमधील जिहादी आतंकवादी संघटनांनी महिला, मुली आणि अल्पवयीन मुले यांचा वापर करणे चालू केले आहे. त्यांच्याद्वारे शस्त्रे आणि अमली पदार्थ यांचा पुरवठा होत आहे. सैन्याच्या ‘चिनार कॉर्प्स’चे लेफ्टनंट जनरल अमरदीपसिंह औजला यांनी ही माहिती दिली.
जम्मू-कश्मीर में आतंकी महिलाओं और बच्चों को बना रहे हथियार, संदेश भेजने से लेकर ड्रग्स और आर्म्स की सप्लाई में हो रहा इस्तेमाल: सेना ने किया खुलासा#JammuKashmirhttps://t.co/8MTPwHBSIn
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 12, 2023
लेफ्टनंट जनरल औजला म्हणाले की, अलीकडच्या काळात गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दल यांनी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या गटांवर वेगाने कारवाई केली आहे. यानंतर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. आणि आतंकवादी संघटना यांनी आतंकवादी कारवायांसाठी महिला अन् मुले यांचा वापर चालू केला आहे. आतंकवाद्यांनी कारवायांसाठी तंत्रज्ञानाचा वापर अल्प केला आहे. ते आता बोलण्यासाठी किंवा संदेश पाठवण्यासाठी भ्रमणभाषसारख्या साधनांचा वापर टाळत असून पारंपरिक साधनांचा वापर वाढवत आहेत.
संपादकीय भूमिकाकाश्मीरमधील आतंकवाद अल्प झालेला नाही, तर तळागाळापर्यंत मुरलेला आहे, हे यावरून स्पष्ट होते ! |