केंद्र सरकारशी संलग्न संस्थेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित केलेल्या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे १३, तर म. गांधी यांचे ३ लेख !

इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर एक टपाल तिकीट काढले होते, हे काँग्रेस कशी काय विसरते ?

जगभरात हिंदूंना अपकीर्त करण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात आहे !  

‘रटगर्स’ विश्‍वविद्यालयातील ऑड्री ट्रश्के या हिंदुद्वेष्ट्या प्राध्यापिका हिंदूंविरोधात सातत्याने गरळओक करत असून अमेरिकेत हिंदुद्वेषी मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे सदर संशोधकांनी त्यांचा निषेध करणेही आवश्यक आहे !

हसनपूर (उत्तरप्रदेश) येथील सरकारी भूमीवरील अवैध मदरसा प्रशासनाने पाडला !

सरकारी भूमीवर अवैधरित्या मदरसा बांधण्यात येईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

(म्हणे) ‘भगतसिंह आतंकवादी होता !’

पंजाबमधील खलिस्तानी मानसिकतेचे शीख नेते आता उघडपणे अशा प्रकारची विधाने करू लागले आहेत. ही पुढे येणार्‍या मोठ्या संकटाची सूचना आहे. केंद्र सरकारने यावर आताच लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक आहे !

लोकसभा सचिवालयाकडून ‘असंसदीय’ शब्दांची सूची घोषित !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रशासनाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून चालू होत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयाकडून ‘असंसदीय’ शब्दांची सूची जाहीर करण्यात आली आहे.

शाळांमध्ये भगवद्गीता शिकवण्यात येऊ नये, यासाठी ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ची गुजरात उच्च न्यायालयात याचिका

‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ने याचिकेत म्हटले आहे की, भारतीय संस्कृतीची मूल्ये आणि सिद्धांत, तसेच ज्ञानाची प्रणाली शालेय पाठ्यक्रमात घेतली जाऊ शकते; परंतु त्यामध्ये एका धर्माच्या पवित्र ग्रंथाच्या सिद्धांतांना प्राधान्य देणे कितपत योग्य आहे ?

नवीन संसद भवनाच्या छातावर बसवण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून अनावरण

राष्ट्रीय प्रतीक असणार्‍या या अशोक स्तंभाचे वजन ९ सहस्र ५०० किलो इतके आहे. साडेसहा मीटर उंच असणारा हा स्तंभ कास्य धातुपासून बनवण्यात आला आहे. हा स्तंभ बसवण्यासाठी ६ सहस्र ५०० किलो वजनाचा स्टीलचा चबुतरा बनवण्यात आला आहे.

आदि शंकराचार्य यांच्या पुतळ्याच्या बांधकामाला मध्यप्रदेश उच्च न्यायालयाकडून स्थगिती

मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्‍वर येथे ५४ फूट उंच व्यासपिठावर उभारण्यात येणार्‍या आदि शंकराचार्य यांच्या १०८ फूट उंच पुतळ्याच्या बांधकामाला मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

गोवा विधानसभा अधिवेशन १० दिवस !

‘‘पंचायत निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचारी लागणार आहेत आणि त्यामुळे या काळात अधिवेशन चालवणे शक्य होणार नाही. यासाठी अधिवेशनाचा कालावधी घटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’’.

‘कॅनडा फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘काली’ माहितीपट दाखणार नाही !

कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालयाने केलेल्या आवाहनानंतर ‘कॅनडा फिल्म फेस्टिव्हल’च्या आयोजकांनी भारताची क्षमा मागत ‘काली’ माहितीपट न दाखवण्याचा निर्णय घेतला.