द्रमुक पक्षाच्या नेत्याच्या विरोधात राज्यपालांकडून मानहानीचा खटला प्रविष्ट !

राज्यपालांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे प्रकरण

डावीकडून द्रमुकचे नेते शिवाजी कृष्णमूर्ती आणि राज्यपाल आर्.एन्. रवि

चेन्नई – तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि यांच्या विरोधात अशोभनीय वक्तव्य केल्याच्या प्रकरणी रवि यांनी द्रमुकचे नेते शिवाजी कृष्णमूर्ती यांच्या विरोधात चेन्नईच्या न्यायालयात मानहानीचा खटला प्रविष्ट केला आहे. या विधानामुळे शिवाजी कृष्णमूर्ती यांना द्रमुक पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी पक्षातून निलंबित केले आहे. भाजपच्या नेत्यांनीही शिवाजी कृष्णमूर्ती यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.

कृष्णमूर्ती म्हणाले होते, ‘‘तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि यांनी त्यांच्या विधानसभेतील भाषणात आंबेडकरांचे नाव घेण्यास नकार दिला, तर मला त्यांच्यावर आक्रमण करण्याचा अधिकार नाही का ? सरकारने दिलेले भाषण तुम्ही वाचता येत नसेल, तर काश्मीरमध्ये जा. तेथे आम्ही आतंकवादी पाठवू जेणेकरून ते तुम्हाला ठार मारतील.’’