पंजाब विधानसभेत ‘अग्नीपथ’ योजनेच्या विरोधात ठराव संमत !

तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी देणार्‍या केंद्र सरकारच्या अग्नीपथ या योजनेविरोधात पंजाब विधानसभेत ३० जून या दिवशी ठराव संमत करण्यात आला. भाजपचे आमदार अश्‍वनी शर्मा आणि जंगीलाल महाजन यांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केले.

‘जी २०’ची बैठक जम्मू-काश्मीरमध्ये घेण्यास चीनचा विरोध !

‘चीनने भारताच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसू नये अन्यथा चीनकडून शिनजियांगमध्ये मुसलमानांवर करण्यात येणार्‍या अत्याचारांविषयी भारत तोंड उघडेल’, अशा शब्दांत भारताने चीनला सुनावण्याची आवश्यकता आहे !

भारताला बलवान बनवू पहाणारी अग्नीपथ योजना !

संधीसाधू काँग्रेसनेही या योजनेला विरोध चालू ठेवला. त्यांना ‘नॅशनल हेरॉल्ड घोटाळा’ प्रकरणाला विरोध करण्यासाठी हे आयते कोलीत सापडले आहे. झारखंड काँग्रेसचे धर्मांध आमदार इरफान अंसारी यांनी तर ‘देशात रक्तपात झाला, तरीही आम्ही अग्नीपथ योजना लागू करू देणार नाही’, असे म्हटले आहे.

दंगलीच्या गुन्हेगारांना अटक !

अनेक धर्मांधांनी गुन्हे करूनही तिस्ता सेटलवाड यांनी त्यांना पाठीशी घातले, त्यांची बाजू घेतली आणि राष्ट्रप्रेमींच्या विरोधात उभ्या ठाकल्या. खोटे पुरावे, प्रसारमाध्यमांना खोट्या मुलाखती, खोटी विधाने करून स्वत:चा डाव साधता येईल, असे त्यांना वाटत असावे; मात्र सत्य हे कधीतरी बाहेर पडतेच !

‘जर द्रौपदी राष्ट्रपती आहेत, तर पांडव कोण आहेत ?’

यावरून अशा दिग्दर्शकांची हिंदुद्वेषी मानसिकता दिसून येते. त्यांनी असा अवमान अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांचा केला असता का ? अशा हिंदुद्वेषी दिग्दर्शकांच्या चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घालून हिंदूऐक्याची चुणूक दाखवावी !

गौहत्ती (आसाम) येथे शिवसेनेचे आमदार रहात असलेल्या हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचे आंदोलन

महाराष्ट्रातील राजकीय पेच हा आसाममधील गौहत्तीपर्यंत पोचला आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांसह येथील ‘रॅडिसन ब्लू हॉटेल’मध्ये थांबले आहेत. याविरोधात तृणमूल काँग्रेसकडून हॉटेलबाहेर आंदोलन करण्यात आले.

‘अल्-जजीरा’ वृत्तवाहिनीकडून हिंदूंनी मौलवीचा शिरच्छेद केल्याचे धादांत खोटे वृत्त प्रसारित !

हिंदूंच्या विरोधात निराधार आणि वास्तव सोडून वृत्ते अन् लेख प्रकाशित करण्याचा अल्-जजीरा वृत्तवाहिनीचा इतिहासच राहिला आहे. भारत सरकारने यासंदर्भात वृत्तवाहिनीला जाब विचारला पाहिजे !

जयपूर येथे झिशानकडून विवाहाचे आमीष दाखवून २३ वर्षीय महिलेवर बलात्कार

महिलांसाठी असुरक्षित होत काँग्रेसशासित राजस्थान राज्य !

भारत सरकारने क्षमा मागण्याविषयीचे अधिकृत पत्र कतार सरकारने मागे घ्यावे, अन्यथा आंदोलन करू !

अशी मागणी का करावी लागते ? भारत सरकारच कतारला पत्र मागे घेण्याविषयी का खडसावत नाही ?

झालवाड (राजस्थान) येथील काँग्रेसच्या नेत्याकडून नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ मोर्चा !

काँग्रेसमधील हिंदूंना धर्माविषयी आणि हिंदुत्वनिष्ठांविषयी आपुलकी वाटू लागणे, हे काळ पालटत असल्याचेच दर्शक होय !