कर्नाटकमध्ये मुसलमान विद्यार्थिनींनी बुरखा न घातल्याने बसचालकाने त्यांना बसमध्ये चढण्यास केला विरोध !

कमलापूर (कर्नाटक) – येथे मुसलमान विद्यार्थिनींना बुरखा न घातल्याने बसमध्ये चढण्यास बसचालकाने विरोध केल्याच्या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या चालकाचे म्हणणे होते, ‘या विद्यार्थिनी बुरखा घातल्यासच त्यांना बसमध्ये घेण्यात येईल.’ यामुळे या विद्यार्थिनींना बसमध्ये चढता आले नाही. या विद्यार्थिनींनी हिजाब (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) घातला होता, तरी त्यांना चालकाने बसमध्ये चढू दिले नाही. चालकाने या मुसलमान विद्यार्थिनींना म्हटले की, तुम्ही मुसलमान असल्यामुळे हिजाब नव्हे, तर बुरखा घातला पाहिजे.

१. चालकाला स्थानिक नागरिकांनी याविषयी विचारणा केल्यावर तो म्हणाला की, बस बिघडली आहे. त्यामुळे विद्यार्थिनी गोंधळ घालत आहेत. बस बंद असल्याचे सांगूनही त्या बसमध्ये बसल्या.

२. या घटनेविषयी राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. चालकाने जे काही केले, ते चुकीचे आहे. कोणता वेश परिधान करावा ?, हा त्या विद्यार्थिनींचा अधिकार आहे, असेही रेड्डी म्हणाले.

संपादकीय भूमिका 

कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आल्यापासून तेथे इस्लामी देश झाल्यासारखीच स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?