बरेली (उत्तरप्रदेश) येथे फरजना हिने हिंदु धर्म स्वीकारून हिंदु प्रियकराशी केला विवाह !

फरजानाच्या पालकांची तिला आणि सासरच्या लोकांना ठार मारण्याची धमकी

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील फरजाना या मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारून हिंदु प्रियकराशी विवाह केला. विवाहानंतर तिचे नाव सरस्वती ठेवण्यात आले आहे. तिच्या या कृतीला तिच्या पालकांनी विरोध केला आहे. सरस्वतीचे म्हणणे आहे की, तिचे पालक तिला आणि तिच्या सासरच्या लोकांना ठार मारण्याची धमकी देत आहेत. तिने व्हिडिओ बनवून तो प्रसारित केला आहे. त्याद्वारे तिने संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या धमकीविषयी पोलिसांनी म्हटले की, त्यांच्याकडे अद्याप याविषयी कोणतीही तक्रार आलेली नाही.

सरस्वतीने सांगितले की, ३ वर्षांपूर्वी माझी ओळख वीरेंद्र कश्यप याच्याशी झाली होि. आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो. मी भगवान श्रीकृष्णाला मानते. मी हिंदु धर्म स्वीकारून वीरेंद्रशी विवाह केला आहे.

संपादकीय भूमिका

शेकडो हिंदु मुली लव्हा जिहादला बळी पडतात; मात्र हिंदु पालक कधीही अशा प्रकारची धमकी देत नाहीत; मात्र एखाद्या घटनेत मुसलमान तरुणी हिंदु प्रियकरासाठी धर्म पालटते, तर मुसलमान लगेचच ठार मारण्याची धमकी देतात आणि काही वेळेत तशी कृतीही करतात, याविषयी निधर्मीवादी तोंड उघडतील का ?