पिलीभीत (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीतील धर्मांधांकडून कावड यात्रेकरूंवर दगडफेक !

कावड यात्रेतील ‘डीजे’ (मोठ्या संगीत यंत्रणा) बंद करण्यास सांगण्यावरून झाला वाद !

पीलिभीत (उत्तरप्रदेश) – येथील बेरली महामार्गावरील खमरिया पुलावर मोहरमची मिवणूक पोचल्यावर तेथूनच कावड यात्रेकरू ‘डीजे’वर धार्मिक गाणी लावून जात असतांना मुसलमानांनी त्यांना ‘डीजे’ बंद करण्यास सांगितले. त्यास कावड यात्रेकरूंनी नकार दिल्यावर झालेल्या वादातून धर्मांध मुसलमानांनी त्यांच्यावर दगडफेक केली. येथे उपस्थित पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बळ मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावून त्यांना पुढे मार्गस्थ केले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, असे सांगण्यात येत आहे. (एक पोलीस अधिकारी घायाळ होऊनही पोलीस धर्मांधांवर कारवाई करत नाहीत, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)

बिहारमध्ये मोहरमच्या मिवरणुकीत ३ ठिकाणी हिंसाचार

बाँबस्फोटात एक मुलगी घायाळ

मोहरमच्या मिरवणुकीत बाँब कसा काय आणला जातो ? आणि त्याचा वापर कसा काय होतो ? पोलिसांच्या गुप्तचरांना याची माहिती कशी मिळत नाही ? उद्या मोठ्या संख्येने धर्मांध उघडपणे बाँबस्फोट घडवू लागले, तर भारताचे पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

१. बिहारमध्ये मोहरमच्या मिरवणुकीमध्ये ३ ठिकाणी हिंसाचार झाला. भागलपूर येथे मिरवणूक जात असतांना मिरवणुकीतून कुणीतरी बाँब फेकला. त्याच्या झालेल्या स्फोटात राधा कुमारी नावाची मुलगी घायाळ झाली. यानंतर स्थानिकांनी मिरवणुकीला विरोध केल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून मिरवणूक मार्गस्थ केली.

२. बलिया गावात मोहरमच्या मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक केल्यानंतर वातावरण बिघडले आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. यात एक पोलीस अधिकारी घायाळ झाला.

३. कैमूर जिल्ह्यातील भभुआ शहरामध्ये गुरुद्वाराजवळ मिरवणुकीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्यावर दोन गटांत जोरदार दगडफेक झाली. यात काही वाहनांची हानी झाली, तर काही जण घायाळ झाले. पोलिसांनी लगेचच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

संपादकीय भूमिका 

दिवसांतून ५ वेळा मशिदींवरून आवश्यक नसतांना देशातील हिंदूंना अजान ऐकवली जाते आणि हिंदूंही ती निमूटपणे सहन करतात, त्याविषयी मुसलमान का बोलत नाहीत ?