मेक्सिकोतील ‘स्त्री’ !

रामराज्यातील स्त्रिया खर्‍या अर्थाने सुरक्षित आणि म्हणूनच आनंदी अन् समाधानी होत्या. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी रामराज्याची स्थापना करणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे संपूर्ण विश्‍वात स्त्रियांना मान, सन्मान आणि आदर देणारे रामराज्य लवकरात लवकर स्थापन होणे हेच कालसुसंगत ठरेल !

‘फ्रीडम हाऊस’ या अमेरिकी संस्थेकडून भारताच्या नकाशाचे विकृतीकरण

हिंदु जनजागृती समितीची भारत सरकारकडे कारवाईची मागणी ! मुळात कोणत्याही संघटनेला अशी मागणी करावी लागू नये, तर सरकारनेच स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !

प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ आणि पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांचे ट्विटर खाते बंद !

भारताचा नव्याने सत्य इतिहास लिहिण्याची कृती सरकारी यंत्रणांकडून याआधीच होणे अपेक्षित होते; मात्र ते फ्रेंच पत्रकाराने केले, हे भारतीय यंत्रणेला लज्जास्पद, आता सरकारनेच ट्विटरला याचा जाब विचारून त्याची जागा दाखवून देणे आवश्यक !

(म्हणे) ‘मोदी सरकार आल्यापासून भारतात लोकांना मिळणारे स्वतंत्र्य घटले !’ – अमेरिकेतील ‘ग्लोबल फ्रीडम हाऊस’चा अहवाल

अमेरिकेत वर्णद्वेषी आक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असतांना या अमेरिकी संस्थेने प्रथम तेथील लोकांच्या स्वातंत्र्याची काळजी घ्यावी. भारतात कुणाला किती स्वातंत्र्या द्यायचे, याची काळजी घ्यायला भारतीय समर्थ आहेत !

(म्हणे) ‘पुराव्याविना करण्यात येणार्‍या आरोपांना कोणताच अर्थ नाही !’

गतवर्षी मुंबईतील खंडित झालेला वीजपुरवठा चीनने केलेल्या सायबर आक्रमणामुळे झाल्याचा दावा अमेरिकेच्या वृत्तपत्राने केला होता. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हे वक्तव्य केले.

मुंबईत मागील वर्षी वीजपुरवठा खंडित होण्यामागे चीनचा हात !

अमेरिकेतील आस्थापनाचा दावा ! गलवान खोर्‍यातील संघर्षाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न ! भारत सरकारने अमेरिकेच्या वृत्तपत्राने केलेला हा दावा खरा कि खोटा, हे पडताळून त्यामागील सत्य समोर आणणे आवश्यक !

आम्ही कोणत्याही पारंपरिक औषधाला मान्यता दिलेली नाही ! – जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

आयुर्वेदीय औषधोपचाराने कोरोना बरा झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे कुणाच्या प्रमाणपत्रांची वाट न पहाता केंद्र सरकारने आयुर्वेदीय औषधोपचार करणार्‍यांना अभय देणे आवश्यक !

धर्मच ती शक्ती आहे जी जगातील मोठ्या लोकसंख्येला ‘पर्यावरण योद्धा’ बनवू शकते ! – संयुक्त राष्ट्रे

उशिरा का होईना संयुक्त राष्ट्रांना धर्माचे महत्त्व लक्षात आले आहे. हिंदु धर्मात निसर्ग आणि पर्यावरण यांना पुष्कळ महत्त्व देण्यात आल्याने त्याच्या रक्षणाचा नेहमीच प्रयत्न केला जातो ! हिंदु धर्मानुसार आचरण केल्यासच खर्‍या अर्थाने पर्यावरणाचे रक्षण होईल !

अमेरिकेच्या दक्षिण भागात आलेल्या हिमवादळामुळे वीज, पाणी आणि अन्न यांविना लाखो लोकांचे प्रचंड हाल !

महासत्ता असलेल्या अमेरिकेला निसर्गाच्या तडाख्यासमोर हतबल व्हावे लागते, तेथे भारताची काय स्थिती होईल, याची कल्पना येते ! अशा आपत्काळात सुरक्षित आणि जिवंत रहाण्यासाठी साधना करून ईश्‍वरी कृपा संपादन करणेच आवश्यक !

नासाच्या ‘पर्सिव्हरन्स’ रोव्हरचे मंगळावर यशस्वी लँडिंग

विज्ञानाद्वारे यान पाठवून अन्य ग्रहांवर जीवसृष्टी होती का ? किंवा आहे का ? याचा शोध घेतला जात आहे; मात्र हिंदूंच्या धर्मशास्त्रानुसार ‘अनेक ब्रह्मांड असून त्यात जीवसृष्टी आहे’, असे सांगितले आहे आणि ऋषी, मुनी, संत, महात्मे यांनी त्याचा अनुभवही घेतला आहे आणि घेत आहेत.