नासाच्या ‘पर्सिव्हरन्स’ रोव्हरचे मंगळावर यशस्वी लँडिंग

मनुष्याच्या मंगळावर जाण्याच्या प्रयत्नाचा भाग !

विज्ञानाद्वारे यान पाठवून अन्य ग्रहांवर जीवसृष्टी होती का ? किंवा आहे का ? याचा शोध घेतला जात आहे; मात्र हिंदूंच्या धर्मशास्त्रानुसार ‘अनेक ब्रह्मांड असून त्यात जीवसृष्टी आहे’, असे सांगितले आहे आणि ऋषी, मुनी, संत, महात्मे यांनी त्याचा अनुभवही घेतला आहे आणि घेत आहेत. पृथ्वीवरील व्यक्तींनी योग्य साधना केली, तर तेही याचा अनुभव घेऊ शकतील; मात्र विज्ञानाला ते साध्य करण्यास सहस्रो वर्षे लागतील किंवा ते साध्य करू शकतील, अशीही अपेक्षा करता येत नाही !

नासाचा रोव्हर मंगळावर पोहोचताच कंट्रोल रूममध्ये पसरले उत्साहाचे वातावरण !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने ‘मंगळ ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात होती कि नाही ?’ हे शोधण्यासाठी राबवलेल्या योजनेच्या अंतर्गत पाठवलेल्या ‘पर्सिव्हरन्स’ नावाच्या रोव्हरचे मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग करण्यात आले. जेजेरो क्रेटर या मंगळावरील दुर्गम भागात हे रोव्हर उतरवण्यात आले. नासाने ७ मासांपूर्वी हे रोव्हर पाठवले होते. या रोव्हरच्या लँडिंगमुळे अमेरिका मंगळावर सर्वाधिक रोव्हर पाठवणारा पहिला देश ठरला आहे.

रोव्हरने पाठविलेली मंगळ ग्रहाची छयाचित्रे
‘जेजेरो क्रेटर’ मंगळावरील दुर्गम भाग

पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळाच्या भूमीवर उतरताच पाठवलेले पहिले छायाचित्र नासाने ट्विटरवर पोस्ट केले आहे. नासाने म्हटले आहे की, जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी हे रोव्हर मंगळावरील माती आणि दगड यांचे नमुने घेऊन येणार आहे. पुढील काही वर्षे तो मंगळावर रहाणार आहे.

या काळात जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचा खुणांचा शोध रोव्हर घेणार असून मंगळावरून नमुने घेऊन पृथ्वीवर परत येईल. ज्यामुळे भविष्यात माणसाचा मंगळावर जाण्याचा मार्ग मोकळा होईल.

Indian-American Swati Mohan spearheads NASA rover landing on mars