पंजाबमध्ये २ जिहादी आतंकवाद्यांना अटक : शस्त्रसाठा जप्त

हे आतंकवादी सणांच्या वेळी पंजाबमध्ये घातपात करण्याच्या सिद्धतेत होते.

सनातन धर्माला संपवण्‍याविषयी ‘हेट स्‍पीच’ करणार्‍यांवर अद्याप कारवाई का नाही ? – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे म्‍हणाले की, सर्वोच्‍च न्‍यायालयाने २८ एप्रिल २०२३ या दिवशी दिलेल्‍या आदेशात स्‍पष्‍ट म्‍हटले आहे की, जर कुणी ‘हेट स्‍पीच’ करून कोणत्‍याही समाजाच्‍या भावना दुखावण्‍याचा प्रयत्न करेल, तर सरकारने तक्रारदाराची वाट न पहाता स्‍वतःच नोंद घेऊन प्रथम दर्शनी अहवाल (FIR) प्रविष्‍ट केला पाहिजे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ ऑक्‍टोबर या दिवशी मुंबई दौर्‍यावर असणार आहेत. आंतरराष्‍ट्रीय ऑलिंपिक समितीचे १४१ वे अधिवेशन मुंबई येथे पार पडणार आहे. या अधिवेशनासाठी ते उपस्‍थित रहाणार आहेत.

‘अल्लाहू अकबर’ म्हणत फ्रान्समधील एका शालेय शिक्षकाची चाकू खुपसून हत्या !

३ वर्षांपूर्वी असाच पॅरिसमध्ये साम्युएल पॅटी नावाच्या एका शिक्षकाचा त्याच्या एका मुसलमान विद्यार्थ्याने ‘अल्लाहू अकबर’ म्हणत शिरच्छेद केला होता. यावरून जगभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते.

कर्नाटकात महिषासुराचे उदात्तीकरण करणार्‍या ‘महिषा दसर्‍या’च्या कार्यक्रमाला काँग्रेसची अनुमती !

काँग्रेस इकडे ‘महिषा दसर्‍या’ला पाठिंबा देते, तर तिकडे पॅलेस्टाईन आणि हमासच्या आतंकवाद्यांचे समर्थन करते. त्यांच्यासाठी महिषासुर हा आदर्शच असणार, यात काय आश्‍चर्य !

इस्रायलप्रश्‍नी भारत सरकारच्या भूमिकेविरुद्ध बोलणार्‍यांवर कारवाई करा ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आदेश

हमासने इस्रायलवर केलेल्या महाभयंकर आक्रमणानंतर इस्रायलने हमासच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. या युद्धानंतर उत्तर प्रदेशातील अलीगड विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी हमास आणि पॅलेस्टाईन यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढले होते.

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवणार्‍या मुसलमान तरुणाला अटक

कर्नाटकच्या होसपेट शहरात पॅलेस्टाईनचे समर्थन केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी आलम पाशा या २० वर्षांच्या तरुणाला अटक केली. त्याने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवले होते.

अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार करणार्‍या पित्याला आजन्म कारावासाची शिक्षा !

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याच्या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने तिच्या वडिलांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासह १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची असतांना ही घटना घडली होती.

म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करण्याची मुदत संपण्यास १२ दिवस शिल्लक

गोवा खंडपिठाने सरकारला निर्देश देतांना म्हटले होते की, ‘म्हादई अभयारण्य क्षेत्र आणि आजूबाजूचा परिसर व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करावा’ आणि त्यासाठी तीन मासांची मुदत दिली होती.

गोव्यात खासगी क्रीडा विद्यापिठाचे स्वागत करू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

काही संस्थांनी यात रस दाखवला आहे. जर एखाद्या खासगी संस्थेने ५० सहस्र चौ.मी. भूमी दाखवल्यास त्या संस्थेला विद्यापीठ चालू करता येईल. क्रीडा क्षेत्र हे भवितव्य घडवण्याचे एक साधन म्हणून अनेक जण त्याचा स्वीकार करणार आहेत.