आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या १४१ व्या अधिवेशनाचे आयोजन !

मुंबई – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ ऑक्टोबर या दिवशी मुंबई दौर्यावर असणार आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे १४१ वे अधिवेशन मुंबई येथे पार पडणार आहे. या अधिवेशनासाठी ते उपस्थित रहाणार आहेत. हे अधिवेशन मुंबईतील जिओओल्ड सेंटरमध्ये १४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे.
भारतात ४० वर्षांनंतर हे अधिवेशन होत आहे. वर्ष १९८३ मध्ये नवी देहली येथे अधिवेशन झाले होते. ऑलिंपिकचे १४१ वे अधिवेशन भारतात होणे, ही क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळे भारताला आगामी काळात अनेक स्पर्धांचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळू शकते. याविषयी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही माहिती दिली आहे. वर्ष २०३६ ची ऑलिंपिक स्पर्धा भारतात व्हावी, यासाठी भारत दावा करू शकतो.
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !