कर्नाटकात महिषासुराचे उदात्तीकरण करणार्‍या ‘महिषा दसर्‍या’च्या कार्यक्रमाला काँग्रेसची अनुमती !

हिंदुत्वनिष्ठ संतप्त !

‘महिषा दसरा’

बेंगळुरू (कर्नाटक) – दसर्‍याच्या दिवशी ‘महिषा दसरा’ या महिषासुराचे उदात्तीकरण करणार्‍या कार्यक्रमाला कर्नाटकातील काँग्रेस सरकारने अनुमती दिली. यामुळे ‘नमो ब्रिगेड’चे संस्थापक आणि विचारवंत चक्रवर्ती सुलिबेले यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ संतप्त झाले आहेत.

राज्यातील दावणगेरे येथे एका कार्यक्रमाच्या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना सुलिबेले म्हणाले की, काँग्रेसची सत्ता आल्यापासून असे निर्णय होणे नवीन नाहीत. राक्षसी प्रवृत्ती असलेल्यांना काँग्रेसकडून समर्थन दिले जाते. ते सदैव राक्षसांच्या बाजूने आहेत. काँग्रेस इकडे ‘महिषा दसर्‍या’ला पाठिंबा देते, तर तिकडे पॅलेस्टाईन आणि हमासच्या आतंकवाद्यांचे समर्थन करते.

संपादकीय भूमिका

जो पक्ष टिपू सुलतानचा उदोउदो करतो आणि सावरकर यांना देशद्रोही म्हणतो, त्यांच्यासाठी महिषासुर हा आदर्शच असणार, यात काय आश्‍चर्य !