राक्षसांमध्येही अशी घटना घडली नसेल ! – न्यायालयाचा संताप

कोटा (राजस्थान) – येथे स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याच्या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने तिच्या वडिलांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासह १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची असतांना ही घटना घडली होती. ही मुलगी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे.
दोषीला प्रत्येक क्षणी पापाचे प्रायचित्त करत रहावे लागेल !
न्यायालयाने शिक्षा सुनावतांना म्हटले की, मुलगी अल्पवयीन असतांना ते तरुण होईपर्यंत तिच्याशी अशा प्रकारे शारीरिक संबंध ठेवणे, हे मानवतेसाठी लज्जास्पद घटना आहे. अशा प्रकारचे उदाहरण राक्षसांमध्येही नाही. काळाच्या ओघात आठवणी धूसर होतात; मात्र वडिलांनी केलेले दुष्कृत्य आणि मुलीच्या मनातील कटू स्मृती विस्मरणात जाऊ शकत नाहीत. दोषी वडिलांना त्याच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत कारागृहात राहून प्रत्येक क्षणी पापाचे प्रायश्चित्त करत रहावे लागेल. त्यांना पाहून भविष्यात कोणताही पिता मुलीवर कुदृष्टी टाकण्याचे धाडस करणार नाही.
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण