केंद्र आणि राज्य शासन एकत्र आल्यास कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या भूमीचा वाद सोडवता येईल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कांजूरमार्ग येथील मेट्रोच्या जमिनीसाठी केंद्र आणि राज्य शासन वाद करत राहिले, तर हा वाद सोडवणार कोण ? केंद्र आणि राज्य एकत्र येऊन हा वाद सोडवता येईल.

रा.स्व. संघाचे मा.गो. वैद्य यांच्या निधनाविषयी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून शोक व्यक्त

‘‘संघ परिवारासाठी मा.गो. वैद्य यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राष्ट्र उभारणीतील त्यांचे अतुल कार्य सदैव स्मरणार्थ राहील.’’

शिर्डी संस्थानकडून दर्शनासाठी नवीन नियमावली घोषित !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिर्डी संस्थानने नाताळच्या निमित्ताने साई दर्शनासाठी नवी नियमावली घोषित केली आहे.

तृणमूल काँग्रेसविरुद्ध आणि भाजपला मत दिले, तर रक्ताचे पाट वहातील ! – बंगालमध्ये भिंतीवर धमकी !

बंगालमध्ये लोकशाहीचे तीनतेरा वाजवण्यात आले आहेत, हेच या धमकीतून उघड होते. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती पहाता येथील सरकार विसर्जित करून राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील एका शाळेत शिकवला जातो जरासंधाने भगवान श्रीकृष्णला पराजित केल्याचा चुकीचा इतिहास !

चुकीचा इतिहास शिकवणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे !

पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी गुरुवायूर मंदिराकडून घेतलेले १० कोटी रुपये परत द्या !

केवळ पैसेच परत घेऊ नयेत, तर असा निर्णय घेणार्‍यांना न्यायालयाने दंड ठोठावला पाहिजे. जर यापूर्वीही अशा प्रकारे मंदिराचे पैसे सामाजिक कार्यासाठी वापरले गेले असतील, तर तेही परत घेण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !

सत्ताधारी माकपच्या कार्यकर्त्यांकडून मंदिरात तोडफोड, देवतांच्या मूर्तींचा अवमान आणि चोरी

केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या विजयाचा उन्माद ! अशी गुंडगिरी करणारे माकपवाले म्हणे पुरो(अधो)गामी आणि सहिष्णु ! अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा निधर्मीवादी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !

‘गोवा इन्क्विझिशन’चा रक्तरंजित इतिहास समोर आणण्यासाठी झालेला #GoaInquisition ‘हॅशटॅग’ राष्ट्रीय ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर !

पोर्तुगिजांकडून केल्या गेलेल्या रक्तरंजित इन्क्विझिशनचा इतिहास गोवा मुक्तीदिनानिमित्त समोर आणण्यासाठी ट्विटरवर धर्मप्रेमींकडून ट्रेंड करण्यात आला.

आरक्षणाचा अधिकार असणारे गुणवान उमेदवार खुल्या प्रवर्गातूनही पदासाठी अर्ज करू शकतात ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नोकरीमध्ये पद भरण्यासाठी उमेदवारांच्या जातींऐवजी त्यांच्या योग्यतेकडे लक्ष दिले पाहिजे आणि गुणवत्ता असणार्‍या उमेदवारांना साहाय्य केले पाहिजे. कोणत्याही स्पर्धेमध्ये नेहमीच योग्यतेवरच उमेदवाराची निवड झाली पाहिजे.

पाकपेक्षा भारतात मुसलमान अधिक असल्याने त्यांना देण्यात आलेला अल्पसंख्यांक दर्जा रहित करा ! – खासदार साक्षी महाराजांची मागणी

केंद्रात साक्षी महाराज यांचाच पक्ष सत्तेत असल्याने त्यांनी ही मागणी मार्गी लावण्यासाठी सरकारचा पाठपुरावा घ्यावा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !