रा.स्व. संघाचे मा.गो. वैद्य यांच्या निधनाविषयी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून शोक व्यक्त

मा.गो. वैद्य

पणजी – ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक अन् प्रचारप्रमुख माधव गोविंद तथा बाबुराव वैद्य यांचे १९ डिसेंबर या दिवशी निधन झाले. त्यांच्या निधनावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शोक व्यक्त केला आहे.

ते ट्वीट करून म्हणाले, ‘‘संघ परिवारासाठी मा.गो. वैद्य यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राष्ट्र उभारणीतील त्यांचे अतुल कार्य सदैव स्मरणार्थ राहील.’’