वृक्षलागवडीचा चौकशी अहवाल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर करा !

राज्यातील ३३ कोटी वृक्षलागवडीचा अहवाल येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात यावा, यासाठी विधानसभेत विरोधक आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांच्या वतीने ४ ऑगस्ट या दिवशी विधासनभेत या समितीच्या पुनर्गठनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

कोकणात कायमस्वरूपी ‘आपत्ती प्रतिसाद दल’ उभारण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा !

आमदार प्रवीण दरेकर यांच्या मागणीची नोंद घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कोकणात कायमस्वरूपी आपत्ती निवारण केंद्रे उभारण्यात येतील’, अशी घोषणा केली आहे.

भारतातील सर्व मुसलमानांनी हिंदु धर्म स्वीकारावा !

के.आर्.के. यांनी म्हटले आहे की, मी भारताच्या सर्व मुसलमानांना सल्ला देतो की, त्यांनी धर्मांतर करून हिंदु व्हावे; कारण तुमचे कुटुंब आणि मुले यांचे जीवन कोणत्याही धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.

विदेशी शक्‍तींनी कुकी समाजाला फूस लावून त्‍यांच्‍याकडून दंगली घडवून आणल्‍या ! – जोजो नाक्रो नागा, पत्रकार, ‘सुदर्शन न्‍यूज’ वृत्तवाहिनी

मणीपूरच्‍या या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे; मात्र यातून जाणीवपूर्वक मैतेई समाज आणि सरकार यांना अपकीर्त केले जात आहे.

अमानुष लाठीमाराची चौकशी करून कारवाई करू ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

मुळात हिंदुत्वनिष्ठांनी कोणतीही हुज्जत घातली नाही ना कुठला अनुचित प्रकार केला ! तरीही पोलिसांच्या लाठीमारात काही हिंदुत्वनिष्ठांची डोकी फुटून ते घायाळ झाले आहेत, तसेच येथे आलेल्या नगराध्यक्षांची कॉलरही पोलिसांनी पकडली.

चारा छावणी चालकांची थकित देयके देण्याचा प्रयत्न करू ! – राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल, पशूसंवर्धनमंत्री

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि माळशिरस तालुक्यांतील चारा छावणी देयके अदा करण्याविषयी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

अधिवेशन संपण्याच्या १ दिवसआधी विरोधी पक्षनेत्याची निवड !

यापूर्वीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पदाचे त्यागपत्र देऊन ते सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे महाविकास आघाडीला विरोधी पक्षाची निवड करावी लागली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ३ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत ही घोषणा केली.

राज्यातील मंदिरांचा आढावा घेण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ यांच्या नावाने योजना चालू करू ! – गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री

राज्यातील सर्व मंदिरांच्या सर्वांगीण विकासासाठी वाढीव निधी देण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

नितीन देसाई यांच्या मृत्यूची राज्य शासनाकडून चौकशी होणार !

प्रसिद्ध मराठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची ‘अपघाती मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली असली, तरी हा मृत्यू आधुनिक सावकारी पद्धतीच्या कर्जवसुलीच्या पद्धतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करत चौकशी करण्याची मागणी केली.

मशिदींवरील भोंगे बंद करा, अन्यथा हिंदूंना रस्त्यावर उतरून प्रतिदिन हनुमान चालिसा आणि आरती करावी लागेल ! – आमदार प्रसाद लाड, भाजप

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही ध्वनीप्रदूषण करणारे मशिदींवरील भोंगे बंद केले जात नाहीत. त्यामुळे शासनाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना मशिदींवरील भोंगे बंद करण्याचे निर्देश द्यावेत.