मुंबई, ३ ऑगस्ट (वार्ता.) – प्रसिद्ध मराठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत केली.
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील चित्रनगरीमध्ये आत्महत्या केल्याची माहिती दिली. देसाई यांची ‘अपघाती मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली असली, तरी हा मृत्यू त्यांच्यावरील कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे झाला. त्यांच्या कर्जत येथील ४३ एकरच्या स्टुडिओवर असलेले १८२ कोटी रुपयांचे कर्ज व्याजामुळे २५२ कोटी रुपये झाले. या प्रकरणाच्या काही ‘ऑडिओ क्लीप’ उपलब्ध झाल्या आहेत. आधुनिक सावकारी पद्धतीच्या कर्जवसुलीच्या पद्धतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करत व्याजाचे दर, कर्जवसुलीची पद्धत याविषयीची चौकशी करण्याची मागणी केली.
Rashesh Shah and ARC Edelweiss company will be investigated in Nitin Chandrakant Desai’s suicide case!
The shocking demise of Nitin Chandrakant Desai, a four-time National Awards winner and esteemed art director, has highlighted the urgent need to investigate questionable… pic.twitter.com/Ny7UoOsLNU
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 3, 2023
काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनीही याविषयीची चौकशीची मागणी करत त्यांचा स्टुडिओ शासनाने कह्यात घेऊन विकसित करावा, अशी मागणी केली.
दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एन.डी. स्टुडिओचा लिलाव न होऊ देता राज्य सरकारने तो अधिग्रहित करावा; ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी मागणी मी आज विधानसभेत केली. नितीन देसाई यांनी आपल्या कर्तृत्वातून, परिश्रमातून, तपस्येने चित्रसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले.… pic.twitter.com/b3jSO8UiN3
— Ashok Chavan (@AshokChavanINC) August 3, 2023
यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘नितीन देसाई यांनी चित्रपटसृष्टीमध्ये मराठी माणसाला अभिमान वाटावे, असे काम केले. अशा कला दिग्दर्शकाचा मृत्यू दुर्दैवी आहे.
Statement on the unfortunate incident of the very creative and talented Nitin Chandrakant Desai in the Maharashtra Legislative Assembly today.
नितीन देसाई हे खऱ्या अर्थाने मराठी माणसाला अभिमान वाटावे, असे व्यक्तिमत्व होते. अनेक राजकीय पक्षांना सुद्धा मोठ्या आयोजनात ते मदत करायचे.… pic.twitter.com/tFYJQ0VIxV— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 3, 2023
त्यांच्यावरील कर्जामुळे त्यांचा स्टुडिओ घेण्यासाठी कुणी दबाव आणला होता का ? याविषयी सरकार चौकशी करेल. त्यांची आठवण म्हणून त्यांचा स्टुडिओचे संवर्धन करता येईल का ? याविषयी कायदेशीर गोष्टी पडताळून निर्णय घेण्यात येईल’, असे म्हटले.