सोलापूर जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’अंतर्गतचे उद्दिष्ट डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत जुलै २०२३ अखेर १६ सहस्र ९१ नळजोडण्या झालेल्या आहेत. डिसेंबर २०२३ पर्यंत ८५५ पाणीपुरवठा योजनांतील नळजोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी देशातील सर्वांत अत्याधुनिक ‘सायबर प्लॅटफॉर्म’ महाराष्ट्रात उभारणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत असून हे गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र ५ व्या क्रमांकावर आहे.

समृद्धी महामार्गावर १०-१५ मिनिटांत रुग्णवाहिका पोचण्याची व्यवस्था करणार ! – दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम विभाग

समृद्धी महामार्गावर आतापर्यंत १०९ अपघात झाले आहेत. अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधातील कायदा व्हावा ! – प्रवीण दरेकर, गटनेते, भाजप

महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून लव्ह जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असून हिंदु मुलींना बळजोरीने धर्मांतर करायला भाग पाडले जात आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अनधिकृत धर्मांतर बंदीचा कायदा आणला आहे.

केरळ विधानसभेचे अध्‍यक्ष ए.एन्. शमसीर यांचा वाशी येथे निदर्शनांद्वारे निषेध !

हिंदूंनो, हिंदु धर्माची विटंबना करणार्‍यांना कठोर शिक्षा होईपर्यंत सनदशीर मार्गाने लढा चालूच ठेवा !

चेंबूर येथील आचार्य आणि डिके मराठे महाविद्यालयात बुरख्यावर बंदी !

येथील आचार्य आणि डिके मराठे महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

पू. भिडेगुरुजी यांच्यावरील कारवाईसाठी विधानसभेत विरोधकांचा पुन्हा गदारोळ !

‘राष्ट्रीय नेत्याविषयी कुणीही अवमानकारक वक्तव्य केल्यास कारवाई केली जाईल. वीर सावरकरांवरही काँग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’ मध्ये ‘माफीवीर’ आणि समलैंगिक असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणीही गुन्हा नोंदवण्यात येईल – देवेंद्र फडणवीस

मंदिरे अधिग्रहण करू नये, या विचाराचे आमचे सरकार आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवस्थानची नावलौकिकता पहाता व्यवस्थापन समितीकडून होणारा भ्रष्टाचार न सांगण्यासारखा आहे. देवस्थानच्या मालकीच्या मिळकतीमध्ये होणारा भ्रष्टाचार, जंगम आणि स्थावर मालमत्तेचा होणारा अपवापर रोखण्याची आवश्यकता आहे.

काँग्रेस पक्षाच्या ‘जनमानसातील शिदोरी’ मुखपत्रावर कारवाई करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री

या मुखपत्रकात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर होते, समलैंगिक होते, सावरकर स्वातंत्र्यलढ्यात उतरले नाहीत’, अशा अनेक आक्षेपार्ह गोष्टी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

मुलुंड (मुंबई) येथील मुक्‍तेश्‍वर आश्रमात विविध विषयांवर व्‍याख्‍यानमाला  !

व्‍याख्‍यानातून ‘मंदिरांतील वस्‍त्रसंहिता’ हा विषय लक्षात आल्‍यावर आश्रमातील एका महिला भक्‍तांनी आश्रमात दर्शनासाठी जीन्‍स परिधान करून आलेल्‍या एका युवतीचे प्रबोधन केले.