हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘मणीपूरमधील हिंसेमागे कोण ?’
मुंबई – मणीपूरमध्ये मैतेई समाज हा बहुसंख्य नाही, तसेच भौगोलिकदृष्ट्याही त्यांच्याकडे प्रदेश अल्प आहे. मणीपूरमधील सध्याच्या परिस्थितीचा भारतविरोधी शक्तींनी लाभ घेतला आहे. विदेशी शक्तींनी कुकी समाजाला फूस लावून त्यांच्याकडून दंगली घडवून आणल्या आहेत. त्यामुळे मणीपूरमध्ये अनेक ठिकाणी मैतेई समाजातील लोकांनी पलायन केले आहे. मणीपूरमध्ये मे मासात महिलांची विवस्त्र धिंड काढली गेली; मात्र याचा व्हिडिओ जुलैमध्ये संसदेचे कामकाज चालू असतांना सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आला. यातून हे सर्व राजकीयदृष्ट्या प्रेरित होते, हे लक्षात आले.
मणीपूरच्या या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे; मात्र यातून जाणीवपूर्वक मैतेई समाज आणि सरकार यांना अपकीर्त केले जात आहे, असे उद़्गार ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीच्या पत्रकार जोजो नाक्रो नागा यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मणीपूरमधील हिंसेमागे कोण ?’, या विषयावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होत्या.
पहा आणि इतरांनाही पहायला द्या –
🎥 मणिपुर हिंसा के पीछे कौन ? | The masterminds of Manipur violence #manipurviolence https://t.co/pcHGHAmGfs
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) July 29, 2023
मणीपूर हिंसाचाराद्वारे भारताला अस्थिर करण्याचा विदेशी शक्तींचा डाव ! – जनपीस, डिजिटल सनातन योद्धा, यू ट्यूब वाहिनी
मैतेई (हिंदू) समाजाला २ सहस्र वर्षांचा इतिहास आहे. मणीपूर राज्याची स्थापना वर्ष १९४९ मध्ये झाली, तेव्हापासून मैतेई आणि कुकी (ख्रिस्ती) समाज यांच्यात संघर्ष चालू आहे. मैतेई समाजातील अनेक हिंदू बांधवांचे धर्मांतर होत आहे. मणीपूरमधील चुरचंदपूर येथे आता मैतेई उरले नाहीत. मणीपूरमध्ये ‘सांस्कृतिक नरसंहार’ होत आहे. मणीपूरच्या लोकांमध्ये फुटीरतेची भावना निर्माण करून देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न राजकीयदृष्ट्या प्रेरित असलेले ‘युरोपियन युनियन’ आणि विदेशी शक्ती करत आहेत. भारत जागतिक महासत्ता होऊ नये, यासाठी हे चालू आहे. मणीपूरमध्ये मोठ्या प्रमाणात अफूची शेती करणार्या कुकी समाजाची अफूची शेतीही शासनाने नष्ट केली. हेही मणीपूरमधील हिंसेमागील प्रमुख कारण आहे.