Illegitimate Wife : एखाद्या महिलेला ‘बेकायदेशीर पत्नी’ किंवा ‘विश्वासघातकी प्रेयसी’ म्हणणे हे राज्यघटनेचे उल्लंघन ! – सर्वाेच्च न्यायालय
राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. एखाद्या महिलेला ‘बेकायदेशीर पत्नी’ किंवा ‘विश्वासघातकी प्रेयसी’ म्हणणे हे भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत त्या महिलेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होईल.