याचिकाकर्त्यांना म्हणणे मांडण्यास २ आठवड्यांची मुदत !

दिशा सालियन हत्या प्रकरण

मुंबई – हिंदी चित्रपट अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर दिशा सालियन हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर ‘याचिकाकर्त्यांना २ आठवड्यांची मुदत देत म्हणणे सादर करण्यास, तसेच आदित्य ठाकरे यांना कह्यात घेऊन चौकशी करण्याची आवश्यकता का आहे, ते पटवून द्या’, असे मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले आहे. न्यायालयाने यासाठी २ आठवड्यांची मुदत दिली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. ‘आपली बाजू न्यायालयाने ऐकून घ्यावी’, असा अर्ज ठाकरे यांच्या वतीने देण्यात आला.