दारूच्‍या बाटल्‍यांवर कर्करोगाच्‍या संदर्भात धोक्‍याची चेतावणी देण्‍याचा मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा आदेश !

मुंबई – दारूच्‍या बाटल्‍यांवर कर्करोगाच्‍या धोक्‍याची चेतावणी देणारा संदेश छापण्‍यात यावा, असे आदेश मुंबई उच्‍च न्‍यायालयाने केंद्र आणि राज्‍य सरकारला दिले आहेत. पुण्‍यातील यश चिलवार या युवकाने या संदर्भात याचिकेद्वारे मागणी केली होती.

सध्‍या कर्करोगाच्‍या रुग्‍णांचे प्रमाण वाढत असून त्‍याचे परिणाम शरिरावर होत आहेत. त्‍यामुळे दारूमुळेही कर्करोगाची शक्‍यता असल्‍याचे याविषयी धोक्‍याची चेतावणी छापणे आवश्‍यक असल्‍याचे या याचिकेत म्‍हटले होते.

न्‍यायालयाने आरोग्‍य विभाग, केंद्रीय आरोग्‍य आणि औषध प्रशासन, भारतीय अन्‍न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांना या संदर्भात नोटिसा पाठवल्‍या आहेत.